Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

ही तर हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणेत्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हा प्रश्न आहे. पण त्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये अशांतता पसरवणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये जे घडले ती, हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती,’ असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. ‘अब हिंदू मार नहीं खाएगा,’ असेही पाटील म्हणाले.

एका कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘अमरावतीमध्ये शनिवारी जे घडले, ती ‘अब हिंदू मार नहीं खाएगा’, अशी एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. यातून चिथावणी देण्याचा विषय येत नाही, तर खऱ्याला खरे म्हणणे ही आमची संस्कृती आहे. आम्ही संघाचे स्वयंसेवक आहोत; तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन करणारे कार्यकर्तेही आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९३ च्या दंगलीत बोटचेपी भूमिका घेतली असती, तर मुंबईतला हिंदू जिवंत राहिला नसता. त्याच बाळासाहेबांचे वारसदार अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये झालेल्या घटनेवर काहीही बोलणार नाहीत. शनिवारच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमध्ये भाजपाचा हात आहे, असा आरोप करीत असतील, तर ठीक आहे,’ असे पाटील म्हणाले.

‘त्रिपुरामध्ये नक्की काय घटना घडली, हे नीट कुणालाही माहिती नाही. त्या संदर्भात एक व्हिडिओ बनवून व्हायरल केला जातो. त्यानंतर अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये अशांतता पसरवली जाते. हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून माजी मंत्री जगदीश गुप्तांसह अनेकांची कार्यालयाची तोडफोड करायची, याचा काय संबंध आहे? त्यामुळे शनिवारच्या घटनेत भाजपाचा हात असेल, तर त्यापूर्वीच्या तोडफोडीच्या घटनेत संजय राऊतांचा हात आहे का?’ असा सवाल पाटील यांनी केला.

.

‘अमरावती, नांदेड, मालेगावमधील घटनांना जबाबदार असलेल्यांना आधी अटक करा; तसेच १५-३० हजारांचा जमाव रस्त्यावर उतरून अशांतता पसरवतो. तेव्हा पोलिसांचे गुप्तहेर खाते करते तरी काय?’

– चंद्रकांत पाटील,

प्रदेशाध्यक्ष, भाजपSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here