Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

रॅकेट उघडकीस येणार?

Array


पुणे : अडीच महिन्यांपूर्वी कारवाई केलेल्या बनावट विम्याच्या प्रकरणात आता मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त आहे. एका बनावट विम्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या तपासात आता तब्बल १७०० वाहनांना बनावट विमा दिल्याचे समोर आले आहे. या वाहनांचा विमा परिवहन विभागाच्या पोर्टलवर कोणाकडून अपडेट झाला, याची माहिती समोर आल्यानंतर या रॅकेटची व्याप्ती कळणार आहे.

एका नामांकित कंपनीचा लोगो आणि शिक्क्याचा वापर करून बनावट विम्याचे दस्तावेज तयार करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात पकडले होते. त्याने रिक्षा, टुरिस्ट कार, टेम्पो आणि ट्रकच्या मालकांना बनावट विमा दस्तावेज कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे समोर आले होते. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बनावट विम्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यात अधिक खोलात जाऊन तपास केला. या व्यक्तीने तब्बल सतराशे जणांना बनावट विमा दिला असल्याचे समोर आले. या प्रकरणी गुन्हे शाखेने प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधून या सतराशे वाहनांची विमा पडताळणी आणि अन्य माहिती मागितली आहे.

‘आरटीओ’ निरीक्षकांचा जबाब

सर्व प्रकारच्या खासगी आणि व्यावसायिक वाहनांचा किमान थर्ड पार्टी विमा असणे अनिवार्य आहे. त्यात वाहन विमा असल्याखेरीज व्यावसायिक वाहनांची पासिंग, फिटनेसची कामे होत नाहीत. त्यामुळे या वाहनांचे विमा काढण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हे कामकाज कसे चालते, याबाबत गुन्हे शाखेने ‘आरटीओ’ निरीक्षकांचा जबाब नोंदवला आहे.

……….

‘एनआयसी’कडे मागितली माहिती

बनावट विमाप्रकरणी गुन्हे शाखेने केलेल्या तपासात १७०० वाहनांपैकी ८०० ते ९०० वाहने पुणे ‘आरटीओ’ कार्यालयात नोंद असलेली आहेत. या वाहनांचा विमा कोणाकडून अपडेट झाला, ‘आरटीओ’ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अपडेट केला असेल, तर कोणत्या ‘यूझर आयडी’वरून झाला, याची सर्व माहिती ‘एनआयसी’कडे मागितली आहे, अशी माहिती ‘आरटीओ’ अधिकाऱ्याने दिली.

……..

परिवहन पोर्टलवर वाहन विमा अपडेट करण्याची मॅन्युअल पद्धत २०१९पासून बंद आहे. तेव्हापासून केवळ विमा कंपनीकडूनच विमा अपडेट केला जात आहे. त्या पूर्वी विमा कंपनीसह अन्य कोणतीही व्यक्ती विमा अपडेट करू शकत होती.

– डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

……….

वाहनांच्या बनावट विम्यासंदर्भात ‘आरटीओ’ला १७०० वाहनांची यादी पाठवली आहे. त्या संदर्भात अधिक माहिती ‘आरटीओ’ प्रशासनाकडून मिळणे अपेक्षित आहे.

– सुनील पंधरकर, वरिष्ठ निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा

……….Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here