Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

महागाई विरोधात काँग्रेसची प्रभातफेरी

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशातील वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसतर्फे रविवारी प्रभातफेरी काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅसच्या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेचे छायाचित्रांचे फलक घेऊन, मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन काँग्रेसचे कार्यकर्ते या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते.

वाढत्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने १४ ते २९ नोव्हेंबर २०२१ दरम्यान देशात ‘जनजागरण अभियान’ आयोजित केले आहे. याअंतर्गत नेहरू स्टेडियम येथील पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यापर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे, राज्य सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, दत्ता बहिरट, वीरेंद्र किराड, अमीर शेख, लता राजगुरू, मनीष आनंद, नीता रजपूत, सोनाली मारणे, संगीता तिवारी आणि राजेंद्र शिरसाट आदी सहभागी झाले होते.

‘भाजपच्या राजवटीत भाववाढीमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. काँग्रेसने भाववाढ आणि इतर ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. मात्र, सरकार त्याकडे काणाडोळा करत आहे. त्यामुळे काँग्रेसने जनजागरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. पुढील १५ दिवसात पुणे शहराच्या विविध वॉर्डात प्रभात फेरी आणि कोपरा सभा घेऊन महागाई विरोधात जनजागरण करण्यात येईल. केंद्र सरकारने त्वरित जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी न केल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल,’ असे बागवे म्हणाले.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here