Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

बेरोजगारांना मिळाला रोजगार

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये ऑक्टोबर महिन्यात १९ हजार ६४८ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळाला. यात पुणे विभागातील चार हजार ७४२ जणांना नोकरी मिळाल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाइन रोजगार मेळावा आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीसाठी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात एक लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर अखेर एक लाख ४७ हजार ८८१ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, अशी माहिती कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट संस्था या सुद्धा वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाइन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९१ हजार ९०८ इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्तपदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल; तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाइन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मलिक यांनी सांगितले.

….

पुण्यात ऑक्टोबरमध्ये चार हजार ७४२ उमेदवारांना रोजगार

ऑक्टोबर २०२१ मध्ये विभागाकडे ५१ हजार ८६२ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुर्ननोंदणी केली आहे. ऑक्टोबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १९ हजार ६४८ उमेदवारांना नोकरी मिळाली. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक सात हजार ६८६, नाशिक विभागात चार हजार ००४, पुणे विभागात चार हजार ७४२, औरंगाबाद विभागात दोन हजार ३७४, अमरावती विभागात ४८४, तर नागपूर विभागात ३५८ इतक्या उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here