Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Homeबाबासाहेब आपण अजून हवे होतात...; नितीन गडकरींचं भावूक ट्वीट
Array

बाबासाहेब आपण अजून हवे होतात…; नितीन गडकरींचं भावूक ट्वीट


हायलाइट्स:

  • बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
  • वयाच्या १००व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • नितीन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली

पुणेः शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही भावूक ट्वीट करत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

नितीन गडकरी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आम्हाला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच. नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली होती. तेव्हा शतायुषी बाबासाहेब पुढेही त्यांच्या वाणीतून शिवराय जिवंत करत राहतील ज्यातून आणखी एक पिढी घडेल असा ठाम विश्वास होता,’ असं ट्वीट नितीन गडकरी यांनी केलं आहे.

‘अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे असेच आहे. याच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा, नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, वाचन, अभ्यास हे सारेच नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे असेच होते,’ असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

वाचाः शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन‘आणखी करोडो हृदये प्रज्ज्वलित होतील आणि बाबासाहेबांची वाणी त्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वास होता. शेवटी एवढंच म्हणेन, बाबासाहेब आपण अजून हवे होतात,’असं म्हणत नितीन गडकरी यांनी बाबासाहेबांनी श्रद्धांजली वाहिली आहे.Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments