Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Home'दळवी'तील करोना उपचार बंद
Array

‘दळवी’तील करोना उपचार बंद


म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने महापालिकेने शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयातील करोनाबाधितांचे उपचार थांबवले आहेत. या रुग्णालयात पूर्वीप्रमाणेच जनरल ओपीडी, प्रसुती आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, येथील ‘म्युकरमायकोसिस‘वरील उपचार केंद्र सुरूच राहणार आहे.

शहराला करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला होता. बाधितांची तसेच गंभीर बाधितांची संख्या वाढल्याने दळवी रुग्णालय पूर्णपणे करोनाबाधित रुग्णांवरील उपचारांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात उपचारासाठी खाटा मिळत नसल्याने दळवी रुग्णालयाची क्षमता १०० वरून १८० पर्यंत वाढविण्यात आली होती; तसेच गंभीर रुग्णांसाठी ‘आयसीयू’चीही व्यवस्था करण्यात आली होती.

करोनाबाधितांवर उपचार सुरू केल्याने येथील प्रसुती, क्षयरोग उपचार केंद्र, महिला आणि बालकल्याण विभागातर्फे करण्यात येणारे लसीकरण बंद करण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली होती. त्यांना इतर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जावे लागत होते. करोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्याने महापालिकेने खासगी रुग्णालयांमधील राखीव खाटा परत केल्या. त्यानंतर ‘सीओईपी’ येथील जम्बो रुग्णालयात नव्या रुग्णांची भरती बंद करण्यात आली. त्यानंतर अन्य काही ‘कोव्हिड’ सेंटरही बंद केली. त्यानंतर केवळ दळवी रुग्णालय, बाणेर येथील कोव्हिड सेंटर सुरू ठेवण्यात आले होते. सध्या शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७५०च्या आसपास असून, गंभीर रुग्णांची संख्या १०० ते ११० दरम्यान आहे. करोनाबाधितांचे घटते प्रमाण लक्षात घेता दळवी रुग्णालयातील करोनाबाधितांवरील उपचार बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

‘दळवी रुग्णालयात प्रसुती आणि इतर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या रुग्णालयात प्रसुतीसाठी ३० खाटा आहेतय पूर्वी दरमहा सरासरी ७० महिलांची प्रसुती होत होती. तसेच जनरल ओपीडीमध्ये १०० जणांची तपासणी केली जात होती. क्षयरोग केंद्र, करोना प्रतिबंधक लसीकरण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गरोदर मातांची तपासणी आदी उपचार पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आले आहेत. या रुग्णालयात पाच डॉक्टर, २२ नर्स यांसह ४० जण कार्यरत आहेत,’ असे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.

दळवी रुग्णालयातील करोना उपचार बंद करण्यात आले असले तरी, अद्याप म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी वॉर्ड सुरू ठेवण्यात आला आहे. या वॉर्डमध्ये १५ खाटा, आयसीयू, ऑपरेशन थिएटर आदी सुविधा आहेत.

– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिकाSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments