Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Restrictive Orders in Pune: पुणे जिल्हा ग्रामीण भागात ‘प्रतिबंधात्मक आदेश’; व्हॉट्सअप अ‍ॅडमीननी घ्यावी ‘ही’ काळजी!

Array


हायलाइट्स:

  • पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले प्रतिबंधात्मक आदेश.
  • समाजकंटकांद्वारे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून काढले आदेश.
  • आक्षेपार्ह पोस्टची जबाबदारी ग्रुप अ‍ॅडमीनची असणार आहे.

पुणे: अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद आणि कारंजा या ठिकाणी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात झालेल्या या घटनांचा फायदा घेऊन काही समाजकंटक इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्वीटर,फेसबुक इत्यादी समाजमाध्यमांद्वारे दोन समाजांमध्ये आणि गटांमध्ये तेढ निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याबाबत आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. (order for curfew in rural areas of pune district and whatsapp admin should take care of this)

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश काढणे आवश्यक होते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. म्हणूनच मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून वरील घटनेच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून हा आदेश काढण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- हडपसरमध्ये भीषण आग्नितांडव, एका अपंग कर्मचाऱ्याचा मृत्यू

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खालील बाबी करण्यात मनाई केली आहे.

> कोणीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमांद्वारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवणे.
> कोणीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाजमाध्यमांद्वारे आक्षेपार्ह पोस्ट टाकणे/शेअर करणे, अशी कृत्ये केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रुप अ‍ॅडमीनची राहील.
> समाज माध्यमांमध्ये चुकीची माहिती/ अफवा जाणीवपूर्वक प्रसारीत करणे.
> पाच आणि पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे तसेच शस्त्र लाठी, काठी वाळगणे.
> कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुराचे फ्लेक्स बोर्ड लावणे आणि त्या प्रकारच्या घोषणा देणे.

क्लिक करा आणि वाचा- कंगना राणावतच्या ‘त्या’ विधानाचे विक्रम गोखलेंकडून समर्थन; म्हणाले…

या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीवर किंवा व्यक्तींवर भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमामे कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- … तेव्हा फडणवीस म्हणाले ‘चूक’ झाली; भाजप- शिवसेना युतीबाबत विक्रम गोखलेंचा दावाSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here