Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Jalgaon : जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र मंगलसिंग विजयसिंह परदेशी यांना पठाणकोट येथे वीरमरण

Array
जळगाव :  जिल्ह्याचे सुपुत्र मंगलसिंग विजयसिंग परदेशी यांना पाकिस्तानच्या सीमेवर पठाणकोट येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी आल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन मोठे भाऊ, पत्नी आणि तीन अपत्य असा परिवार आहे.

रविवारी सकाळी दीड वाजायच्या सुमारास त्यांना गोळी लागली. त्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांना वीरमरण आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वीर जवान मंगलसिंग परदेशी हे सैन्य दलात ईएमई मध्ये नायक पदावर कार्यरत होते. वयाच्या अठराव्या वर्षीच ते सैन्य दलात भरती झाले होते.

पाचोरा तालुक्यात सावखेडा परिसरात जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या मंगल सिंग यांना लहानपणापासून देशसेवेची आवड होती. त्याच प्रेरणेतून ते वयाच्या अठराव्या वर्षी सैन्य दलात दाखल झाले होते. आज मंगलसिंग विजयसिंग परदेशी यांना पाकिस्तानच्या सीमेवर पठाणकोट येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले.

उद्या म्हणजे दिनांक 16 नोव्हेंबरला, सोमवारी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथे त्यांच्या वर शासकीय इतमामात अंत्य संस्कार केले जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

Pulwama : पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

CRPF Jawan Released: नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंहचे पहिले छायाचित्र, कुटुंबियांना भावना अनावर

Parbhani : वायुदलाच्या सेवेत असणारे महागावचे शहीद जवान जिजाभाऊ मोहितेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा भीषण हल्ला, कर्नल, बायको, मुलांसह 7 जणांचा मृत्यू

Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here