Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Homeसमुपदेशनाने दिली जगण्याची संधी
Array

समुपदेशनाने दिली जगण्याची संधीअमृता ओंबळे,

या उपक्रमामुळे मागील वर्षात आतापर्यंत २४० विधिसंघर्षित बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. यामुळे या मुलांना उत्तम आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. हा उपक्रम आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला होता.

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील विधिसंघर्षित बालकांचे विशेष बाल पोलिस पथक, बाल कल्याण सामाजिक संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, समाजसेवक यांच्या मदतीने समुपदेशन करण्यात येते. औद्योगिक संस्थांच्या मदतीने त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांना योग्य मार्गावर आणणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

याबाबत बोलताना पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘कोणत्या कारणांमुळे बालक गुन्हेगार होतात याची पडताळणी झाली पाहिजे. काही वेळा भरकटल्यामुळे बालक गुन्हेगारीकडे वळतात. त्यांच्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करायची आवश्यकता आहे. त्यांच्यातील कलागुण, खेळाची आवड आदी बाबींची नोंद करून त्यांचा कल निश्चित केला पाहिजे. त्यानुसार त्यांना प्रशिक्षण देऊन संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यापुढील काळात त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता सामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्य व्यतीत करावे असा हेतू आहे.’

वयाच्या १८ वर्षांखालील आरोपींना विधिसंघर्षित बालक म्हटले जाते. यामध्ये या मुलांना योग्य वेळी योग्य दिशा मिळाली नाही तर या मुलांचे पुनर्वसन अशक्य होते. घरात आर्थिक चणचण, अवेळी लागलेले व्यसन, पालकांचे दुर्लक्ष यामुळे ही मुले गुन्हेगारीकडे वळतात. या आरोपींवर भारतीय दंडविधान (आयपीसी) अंतर्गत गुन्हे दाखल केले जातात. ही अल्पवयीन मुले गुन्हेगार नसतात. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत गुन्हा केला हे जाणून घेतल्यास त्या मुलांना यापासून परावृत्त करणे सोपे होते. याच विचाराने सुरू झालेल्या या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम होत आहे,’ असेही कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाअंतर्गत ३१ ऑक्टोबर २०२० रोजी विधिसंघर्षित बालकांचे समुपदेशन यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये शहरातील औद्योगिक संस्था, बाल कल्याण सामाजिक संस्था, मानसोपचार तज्ज्ञ, बाल पथकाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. पोलिस आयुक्तालयाअंतर्गत निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ओटा स्कीम येथे मुलांसाठी विशेष कार्यक्रम झाला. या ठिकाणी या मुलांसाठी समुपदेश सुरू आहे. आतापर्यंत १४ ते १८ वयातील १४८ बालकांचे समुपदेशन केले आहे.

पोलिस आयुक्तालयाच्या वतीने रेवांशी बहुउद्देशीय संस्थेद्वारे पाच डॉक्टर, १४ मानसोपचार तज्ज्ञांद्वारे ‘टॉक टू मी’ गटाच्या वतीने १६४ बालकांचे समुपदेशन करण्यात आले. यामध्ये गुन्हेगारी मार्गाला जाण्याचे कारण, कौटुंबिक पार्श्वभूमी यांचाही अभ्यास करण्यात आला. जर्मनीतील तेरे देस होम्स या संस्थेच्या माध्यमातून मनोवैज्ञानिक चाचणी व समुपदेशनद्वारे व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. या वेळी १९ विधिसंघर्षित बालकांची कौशल्य प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.

मुलांसाठी खेळांचे आयोजन

पोलिस आयुक्तालयांतर्गत निगडी पोलिस ठाणे हद्दीत ओटा स्किम येथे विशेष बाल पोलिस पथकाच्या पुढाकाराने दिशा भरकटलेल्या बालकांना त्यांची शक्ती योग्य दिशेला यावी यासाठी खेळ आयोजित केले जात आहेत. दर महिन्याला रविवार व बुधवारी सकाळी आठ ते १० या वेळेत हा उपक्रम आयोजित केला जातो.

विधिसंघर्षित बालकांचे पुनर्वसन या उपक्रमांतर्गत शहरातील संबंधित बालकांचे समुपदेशन; तसेच त्यांना रोजगार, शिक्षण देण्यासाठी काम केले जाते. या अंतर्गत त्यांना आवश्यक असणारे प्रशिक्षण मोफत देण्याचे उद्दिष्ट आहे.

– डॉ. सागर कवडे, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग; तसेच विशेष बाल पथकाचे प्रमुखSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments