Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

‘महाराष्ट्रातील पाणीपुरवठा’ पुन्हा प्रकाशित होणार

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्रातील पाऊस, पाणी, जमीन, नद्या असा सर्वांगीण शास्त्रशुद्ध अभ्यास मांडणारे नरहर आपटे यांचे ‘महाराष्ट्रातील पाणीपुरवठा’ हे पुस्तक लवकरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुनर्प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकात महाराष्ट्रातील पाण्याचा मूळ स्रोत, ते साठवण्यामागचे शास्त्र, जमिनीचा प्रकार, नद्या, नद्यांचे क्षेत्रफळ, तलाव, शेती, विहिरी अशी सर्व माहिती आकडेवारीसह प्रकाशित करण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठाच्या मुद्रणालयातून १९६० मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळाकडून हे पुस्तक लिहिण्याची सूचना नरहर आपटे यांना करण्यात आली होती, त्यानुसार हे पुस्तक त्या वेळचे अनेक संशोधनपर अभ्यास, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील अभ्यासाचे संदर्भ देऊन लिहिण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांच्याकडे या पुस्तकाची प्रत मिळाली असून, महाराष्ट्रातील पाण्याचा मूळ इतिहास, त्यामागे असणारे भूशास्त्र आणि विज्ञान असा परिपूर्ण अभ्यास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. संजय चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रसेनजीत फडणवीस आदींनी हे पुस्तक पुनर्प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. राज्यातील पाण्याबाबतची जवळपास संपूर्ण प्राथमिक माहिती या पुस्तकात आहे.

भूगर्भशास्त्राचा प्राध्यापक म्हणून महाराष्ट्रातील अनेक वर्षे जुनी माहिती, संदर्भ लोकांसमोर यावे असे वाटते. म्हणून या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला आहे.

– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here