Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

बेकायदा प्रवासी वाहतुकीवर कारवाई गरजेची

Array


म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून बेकायदा प्रवासी वाहतूक आणि क्षमतेक्षा अधिक मालाची वाहतूक वाढली आहे. परिणामी, येथील अपघातांत वाढ झाली असून, परिवहन विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिवहन आयुक्तालयाच्या आदेशानुसार वायूवेग पथकाने या वाहनांवर कारवाई थांबविल्यानेच हे चित्र निर्माण झाले असल्याचा आरोप केला जात आहे.

बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक होते. त्यामध्ये वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्याही अधिक आहे. तसेच, सोलापूर महामार्गावरूनही मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक चालते. मात्र, या वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत वायूवेग पथक कार्यरत नसल्याचे दिसून येते. परिवहन आयुक्तालयाने निश्चित करून दिलेल्या दंड वसुलीचे उद्दिष्ट साध्य न झाल्याचा ठपका ठेवून बारामतीच्या वायूवेग पथकावर कारवाई केली आहे. त्यांना बेकायदा प्रवासी वाहतूक आणि ‘ओव्हरलोड’ वाहनांवर कारवाई न करण्याची ताकीद दिली आहे. मात्र, त्यामुळे वाहतुकीच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

……………

कर वसुली; वाहन पुनर्नोंदणी महत्त्वाची

बारामतीच्या वायूवेग पथकाकडून गतकाळात केवळ बेकायदा प्रवासी आणि ‘ओव्हरलोड’ वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, थकीत मोटार वाहन कर आणि पर्यावरण कराची वसुली करणे, नोंदणीची मुदत संपलेल्या वाहनांची पुनर्नोंदणी करून घेणे आदी कामांकडे दुर्लक्ष झाले होते. पंधरा वर्षांहून अधिक जुनी पुनर्नोंदणी न झालेली वाहनेदेखील धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे जाणीवपूर्वक वायूवेग पथकाकडून ही कामे करून घेतली जात आहेत, अशी माहिती परिवहन आयुक्तालयातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

…………

वायूवेग पथकाला नेमूण दिलेले काम सुरू आहे. पथकाच्या कारवाईचे स्वरूप आवश्यकतेनुसार बदलत राहते. पुढील आढावा बैठकीत पथकाच्या कामाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

– अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

…………..

वायूवेग पथक बंद केले नाही. त्यांना थकीत कर, पर्यावरण कर वसुलीचा आदेश दिला आहे. मात्र, अवैध प्रवासी वाहतूक, ‘ओव्हरलोड’ वाहने आणि अपघातांबाबतची माहिती निदर्शनास आल्यास संबंधितांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील.

– अभय देशपांडे, उपायुक्त, अंमलबजावणी विभाग, परिवहन आयुक्तालय

………………Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here