Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाइन गंडा

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

बँक खात्याला ‘पॅन’ क्रमांक जोडण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने कोंढव्यातील ज्येष्ठ व्यक्तीला पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ५७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध ‘आयटी अ‍ॅक्ट‘सह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा जाहिरात एजन्सीचा व्यवसाय आहे. सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून तुमचे खाते बंद होणार असून, तुम्ही तत्काळ ‘पॅन’ क्रमांक अपडेट करून घ्या, असा मेसेज पाठविला होता. तक्रारदारांना हा मेसेज बँकेतून आला असावा, असे वाटल्यामुळे त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून सायबर चोरटा सांगेल त्याप्रमाणे प्रक्रिया केली. काही वेळातच तक्रारदारांच्या बँक खात्याचा ताबा चोरट्याने घेऊन त्यांच्या खात्यातून पाच लाख चार हजार ३४२ रुपये आपल्या खात्यात वळवले.

खात्यातून पैसे कमी झाल्याचा मेसेज येताच फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here