Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

अनियंत्रित मधुमेहामुळे सांधेदुखीत वाढ

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

मधुमेहामुळे हृदय, डोळे, मूत्रपिंडासह हाडांच्या रचनेवरही परिणाम होत आहे. अनियंत्रित मधुमेहामुळे सांधेदुखीचे दुखणे वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. आहार, व्यायामाच्या पद्धतीत नियोजनबद्ध बदल केल्यास मधुमेह नियंत्रणात राहू शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘अनियंत्रित मधुमेहामुळे हाडांच्या रचनेत बदल होतो. हाताची बोटे, खांदे, मान, पाठीचा कणा आणि स्नायूवर परिणाम होतो. सांध्यात वेदना, हालचाल मंदावणे, सांध्यात सूज येणे किंवा ताठरपणा जाणवणे अशी लक्षणे मधुमेहींमध्ये दिसतात. डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे पाय आणि सांध्यांमध्ये मुंग्या आल्यासारखे वाटते. अनेकदा मधुमेहाच्या रुग्णांना पायदुखीची तक्रार असते. त्यावर वेळीच निदान न झाल्यास संधिवाताच्या त्रासामुळे कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची भीती असते,’ असे मधुमेहतज्ज्ञ डॉ. स्नेहल देसाई यांनी सांगितले.

अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विश्वजित चव्हाण म्हणाले, की अनियंत्रित मधुमेहामुळे सांधेदुखीची समस्या उद्भवू शकते. अनेक वर्षांपासून मधुमेह असलेल्यांमध्ये सांधेदुखीचे दुखणे वाढते. प्रत्येक मधुमेहींना हा त्रास होतोच असे नाही. ऑस्टिओपोरोसिस किंवा संसर्गामुळे मधुमेहींच्या सांधे आणि मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते. रुग्णांच्या शरिरात रक्ताची कमतरता असल्यासही सांध्यात वेदना जाणवू शकतात.

अनियंत्रित मधुमेहामुळे हृदय, डोळे आणि मूत्रपिंडावर परिणाम होतो. शिवाय सांधेदुखीचे दुखणे वाढते. त्यामुळे साखर नियंत्रित ठेवणे हेच मोठे आव्हान असते. प्रत्येक मधुमेही व्यक्तीने नियमित व्यायाम, योग्य तो आहार घेतल्यास मधुमेह नियंत्रित राहू शकतो. लठ्ठपणा असेल तर वजन कमी करणे हाच त्यावरील उपाय आहे. प्रत्येकाने ‘एचबीएवनसी’वर लक्ष ठेवावे.

डॉ. शैलजा काळे, मधुमेह तज्ज्ञ

जीवनशैली बदलल्यास मधुमेह नियंत्रणात

आरोग्यदायी जीवनशैली हाच मधुमेह नियंत्रणासाठीचा सर्वांत सोपा उपाय आहे. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांवर लक्ष द्या, असा सल्ला एंडोक्रोनोलॉजिस्ट डॉ. उदय फडके यांनी दिला. वारंवार लघवीला जावे लागणे, जास्त तहान लागणे, भूक वाढणे, व्यवस्थित आहार असूनही वजन कमी होणे, जखम लवकर बरी न होणे, पुरुषांमधील लैंगिक समस्या ही मधुमेहाची काही लक्षणे असू शकतात. रक्तातील साखरेची उच्चपातळी गाठेपर्यंत अनेक लोकांना चिन्हे किंवा लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांचे वय तीसपेक्षा जास्त आहे, ज्यांना मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास आहे, लठ्ठ व्यक्ती, रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉलच्या समस्या आहेत, तसेच ज्या महिलांमध्ये पीसीओडीच्या समस्या आहेत अशा सर्वांनी लक्षणे चाचणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाशीपोटी तसेच जेवणानंतरची ‘एचबीएवनसी’ची चाचणी करून घ्यावी. योग्य आहार, व्यायाम करणे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने वजन नियंत्रित ठेवणे अशी जीवनशैली ठेवल्यास मधुमेह नियंत्रणात राहू शकतो, असा विश्वास डॉ. फडके यांनी व्यक्त केला.

नियंत्रणासाठी काय करावे?

– नियमित व्यायाम करावा.

– चालणे, पोहणे, सायकल चालवणे.

– एरोबिक्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि जॉगिंग आवश्यक.

– दररोज आहारात ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि शेंगा यांचा समावेश करा.

– जंकफूड, तेलकट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा.

– सांधेदुखीची समस्या टाळण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी तपासा.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here