Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Homeवाहनतळावर नागरिकांची लूट
Array

वाहनतळावर नागरिकांची लूट


म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेने दंड ठोठावल्यानंतरही वाहनतळांवर गाडी लावणाऱ्या वाहनचालकांच्या लुटीचे प्रकार अजूनही सुरू आहेत. दुचाकीसाठी प्रतितास तीन रुपये दर असताना प्रत्यक्षात दहा रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे महापालिकेचा ठेकेदारांवर वचक राहिलेला नसल्याची टीका नागरिक करत आहेत.

महापालिकेचे शहरात तीस वाहनतळ आहेत. हे वाहनतळ ठेकेदारांना चालविण्यासाठी देण्यात आलेले आहेत. या वाहनतळांवर चारचाकी वाहनांसाठी चौदा रुपये प्रतितास, तर दुचाकी वाहनांसाठी तीन रुपये प्रतितास शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी यापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहेत. वाहनतळावर अपुरी प्रकाशव्यवस्था, अस्वच्छता याबाबतही नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. त्याचबरोबर निश्चित दर किती आणि त्यापेक्षा अधिक दर का आकारला, याबाबत विचारणा केल्यानंतर वाहनतळाच्या कर्मचाऱ्यांकडून दादागिरी, दमदाटी केली जात असल्याच्याही तक्रारी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यातच वाहनतळावर निर्धारित शुल्क न लिहिल्याबद्दल महापालिकेने आयर्न वाहनतळाच्या ठेकेदाराला दोन लाख १४ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, यानंतरही अतिरिक्त पैसे घेऊन नागरिकांची लूट सुरूच असल्याचे पुढे आले आहे.

‘मटा’च्या एका जागरूक वाचकाने हा प्रकार पुढे आणला. ‘मंडईजवळील बाबू गेनू (आर्यन) वाहनतळावर दुचाकी लावली होती. पावती देताना नेमके शुल्काच्याच ठिकाणी स्केचपेनने गाडीचा नंबर लिहिला गेला. त्यामुळे नेमके शुल्क किती हेच वाचता येत नव्हते. वाहनतळाच्या परिसरात कोठेही शुल्काचा फलक लावलेला नव्हता. गाडी काढताना तीन ऐवजी दहा रुपये जबरदस्तीने वसूल केले गेले,’ अशी तक्रार या वाचकाने केली. ‘महापालिकेच्या वाहनतळावर असा अनुभव सर्रास येतो. पावतीच्या मागील बाजूस शुल्काची रक्कम छापली किंवा संगणकीकृत पावती दिल्यास हे प्रकार टाळता येतील,’ असेही या वाचकाने स्पष्ट केले.

महापालिकेच्या वाहनतळांवर महापालिकेने निश्चित केलेले शुल्कच आकारणे ठेकेदारांवर बंधनकारक आहे. हे शुल्क ठळकपणे दर्शनी भागात लावणेही आवश्यक आहे. निश्चित शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारले गेल्यास नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करावी. तक्रारीबाबत ठेकेदाराकडून खुलासा मागविण्यात येईल. खुलासा समाधानकारक नसल्यास निविदेमधील अटी-शर्तींनुसार संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल.

– श्रीनिवास बोनाला, प्रमुख, प्रकल्प विभागSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments