Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Homeबनावट जामीन; टोळी पकडली
Array

बनावट जामीन; टोळी पकडली


म. टा. प्रतिनिधी, पुणे

गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी लागणारी बनावट कागदपत्रे व जामीनदार पुरविणारी टोळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या आरोपींनी शिवाजीनगर, लष्कर, पिंपरी, खडकी कोर्टात एजंटमार्फत बनावट जामीनदार दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून बनावट शिधापत्रिका, आधार कार्ड, सातबारा उतारे, छायाचित्र, रबरी शिक्के असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपाळ कुंडलिक कांगणे (वय ३३, रा. मोरवाडी, पिंपरी ), रवी राजू वाघमारे (वय २९), हसन हाजी शेख (वय २५), सागर अनंत काटे (वय २५), सोनू हरी शिंदे (वय २०), सलीम सायधन शेख (वय २७, चौघे रा. राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव), इनकर सुंदर कांबळे (वय ३८, रा. आनंदनगर, चिंचवड), रोहित विद्यासागर पुटगे (वय २४, रा. वैदू वस्ती, पिंपळे गुरव), किरण दादाभाऊ सूर्यवंशी (वय २७, रा. आदर्शनगर, पिंपळे गुरव) आणि मंगेश महादेव लोंढे (वय ३१, रा. पिंपळे सौदागर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शिवाजीनगर, खडकी न्यायालयाच्या आवारात बनावट कागदपत्रांच्या आधारे गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक विनायक गायकवाड यांनी विविध पथके तयार करून शिवाजीनगर, खडकी कोर्ट परिसरात पाळत ठेवली होती. शिवाजीनगर कोर्टाच्या आवारातून सात जणांना तसेच, खडकी कोर्टाच्या आवारातून तीन जणांना अशा एकूण दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून जामीन मिळवून देण्यासाठी लागणारी बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली. या वेळी पोलिसांची काही पथके त्यांच्या घरी गेली होती. त्यांनी घराची झडती घेतल्यानंतर त्या ठिकाणी शिक्के, बनावट कागदपत्रे मिळाली आहेत.

सात-आठ हजारांत बनावट जामीनदार

एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जामीनदार न मिळाल्यास हे आरोपी त्यांना जामीनदार मिळवून देत होते. त्यासाठी लागणारे आधार कार्ड, सातबारा बनावट उतारा तयार करून व्यक्तीला उभे केले जात होते. एका जामीनदारासाठी आरोपी सात ते आठ हजार रुपये घेत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी काही रक्कम बनावट जामीनदार म्हणून उभे राहणाऱ्या व्यक्तीला दिली जात होती. एकच व्यक्ती बनावट नावाने तीन ते चार जणांना जामीनदारदार राहिल्याचे समोर आहे. तर, गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असून, त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याची गरज

शिवाजीनगर व शहरातील इतर कोर्टात बनावट जामीनदार देणाऱ्या टोळीला आतापर्यंत पोलिसांनी दोन वेळा अटक केली आहे. त्या वेळीदेखील मोठ्या संख्येने आरोपी पकडून त्यांचे रॅकेट उघडकीस आणले होते. या गुन्ह्यातील आरोपी गोपाळ कांगणे याला पूर्वी अशाच गुन्ह्यात अटक केली होती. जामिनावर चार महिन्यांपूर्वी सुटल्यानंतर त्याने पुन्हा हा उद्योग सुरू केला होता. या आरोपींना पकडल्यानंतर तात्पुरते रॅकटे बंद होते. त्यानंतर काही दिवसांमध्ये हे रॅकेट पुन्हा सुरू होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच, या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहेत.Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments