Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

नियोजन समितीत भाजपचे वर्चस्व

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या (पीएमआरडीए) पुणे महानगर नियोजन समितीच्या ३० जागांपैकी १६ जागा जिंकून भाजपने वर्चस्व राखले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागा मिळवून जिल्ह्यातील दबदबा कायम ठेवला आहे. शिवसेनेने एक जागा घेऊन अस्तित्व राखले. एक जागा लढवून निवडणुकीत चुरस निर्माण केलेल्या काँग्रेसच्या पदरी एकही जागा पडली नाही. पुण्यात नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदू कदम यांना पराभव पत्करावा लागल्याने काँग्रेसवर नामुष्की ओढवली आहे.

या निवडणुकीत मोठे नागरी मतदार संघ, लहान नागरी मतदार संघ आणि ग्रामीण मतदार संघ असे तीन मतदारसंघ होते. मोठ्या नागरी मतदार संघामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतील नगरसेवकांनी मतदान केले. या मतदार संघात २२ जागांसाठी २३ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यासाठी १३७ नगरसेवक आणि १४८ नगरसेविका मतदार होत्या. पैकी १३३ नगरसेवक आणि १४५ नगरसेविकांनी मतदान केले होते. दोन्ही महापालिकांतील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे १४, ‘राष्ट्रवादी’ चे सात आणि शिवसेनेचा एक सदस्य निवडून येणे अपेक्षित होते. मात्र, काँग्रेसने कदम यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

लहान नागरी मतदार संघात एक जागा होती. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मिळविली. या मतदारसंघासाठी नगरपरिषदांमधील सदस्यांनी मतदान केले. ग्रामीण मतदार संघात सात जागा होत्या. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवर आणि भाजपने दोन जागांवर विजय मिळवला. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. या मतदार संघात सात जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांनी मतदान केले. ५८२ सदस्यांपैकी ५८० जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यामध्ये २७२ पैकी २७१ पुरुष मतदारांनी आणि ३१० पैकी ३०९ महिला मतदारांनी मतदान केले.

……..

पक्षीय बलाबल

एकूण जागा – ३०

भाजप -१६

राष्ट्रवादी काँग्रेस -१२

शिवसेना -१

अपक्ष-१

काँगेस – ०

………..

मोठे नागरी मतदार संघ (महापालिका)

एकूण जागा -२२

भाजप -१४

राष्ट्रवादी काँग्रेस – ७

शिवसेना- १

काँग्रेस – ०

…….

लहान नागरी मतदार संघ (नगरपरिषदा)

एकूण जागा- १

राष्ट्रवादी काँग्रेस -१

…….

ग्रामीण मतदार संघ (जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या)

एकूण जागा – ७

राष्ट्रवादी काँग्रेस – ४

भाजप – २

अपक्ष -१

शिवसेना – ०

काँगेस – ०

………..

मोठे नागरी मतदार संघ विजयी उमेदवार

भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना

राजेंद्र शिळीमकर वैशाली बनकर अविनाश साळवे

मंगला मंत्री दिलीप बराटे

राणी भोसले बाबुराव चांदेरे

किरण दगडे सचिन दोडके

अनिल टिंगरे अजित गव्हाणे

प्रवीण चोरबेले मोरेश्वर भोंडवे

हरिदास चरवड वैशाली घोडेकर

ज्योती कळमकर

संदीप कस्पटे

जयश्री गावडे

निर्मला गायकवाड

नामदेव ढाके

वसंत बोराटे

चंद्रकांत नखाते

………….

ग्रामीण मतदार संघ विजयी उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस भाजप अपक्ष

प्रियांका पठारे स्वप्नील उंद्रे यशवंत गव्हाणे

वसंत भसे कुलदीप बोडके

सुखदेव तापकीर

दिपाली हुलावळे

……

लहान नागरी मतदार संघ विजयी उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस

संतोष भेगडेSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here