Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

दीड महिन्यांनी शो होणार सुरू

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘अनलॉक’नंतर आता शहरातील ऐतिहासिक ठिकाणे आणि पर्यटनस्थळेही खुली झाली असताना, पुण्याचा मानबिंदू शनिवारवाड्यातील पेशवाईचा आणि मराठ्यांच्या शौर्यगाथेचा इतिहास सांगणारा ‘मी शनिवारवाडा बोलतोय’ हा लाइट अँड साउंड शो अद्यापही बंद आहे. हा शो सुरू होण्यासाठी आणखी किमान महिना-दीड महिना लागण्याची शक्यता असल्याने पुण्यासह पुण्याबाहेरील पर्यटकांना पुढील वर्षीच त्याचा अनुभव घेता येणार आहे.

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचाही राज्याबरोबर पुण्यालाही मोठा फटका बसला. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाउन करावा लागला. त्यात पर्यटनस्थळेही बंद झाली. दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर हळूहळू ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली. त्यात शेवटच्या टप्प्यात ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळेही खुली करण्यात आली. सुट्ट्यांमुळे सध्या शनिवारवाड्यासह शहरातील पर्यटनस्थळांवर गर्दी होताना दिसत आहे. याच वेळी हा ‘लाइट अँड साउंड शो’ बंद असल्याबद्दल पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत.

ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा शनिवारवाडा पाहण्यासाठी देशभरातून; तसेच परदेशातूनही पर्यटक येतात. पुणे दर्शन सहलीतही शनिवारवाड्याचा समावेश आहे. शनिवारवाड्याचा इतिहास पर्यटकांना समजावा, यासाठी महापालिकेने काही कोटी रुपये खर्चून या ठिकाणी ‘लाइट अँड साउंड शो’ सुरू केला. २००० सालापासून ‘लाइट अँड साउंड शो’ची सुरुवात झाली. काही काळाने या कार्यक्रमात ‘लेझर शो’चाही समावेश केला गेला. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांतून प्रत्येकी अर्ध्या तासाचे शो पर्यटकांसाठी दाखविले जात होते.

‘महापालिकेतर्फे हा शो चालविण्यासाठी निविदा काढली जाते. करोनामुळे मागील दोन वर्षांपासून हा शोदेखील बंद राहिला. त्यामुळे ही निविदाही संपुष्टात आली आहे. त्यामुळे हा शो सुरू करण्यासाठी पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागेल. येथील यंत्रणेची देखभाल दुरुस्तीही करावी लागणार आहे. त्यासाठीही काही कालावधी जाण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

सुट्टीनिमित्त आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांसह आम्ही शनिवारवाडा पाहायला गेलो होतो. त्या वेळी ‘लाइट अँड साउंड शो’ पाहण्याचीही इच्छा होती; परंतु हा शो बंद असल्याचे कळले. हा शो कधी सुरू होणार, याबाबत कोणतीही माहिती दिली गेली नाही.

– रमेश जोशी,

नागरिक

शनिवारवाडा पर्यटकांसाठी खुला झाला आहे. त्यामुळे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून चाचणी घेऊन ‘लाइट अँड साउंड शो’देखील सुरू करण्यात येईल. लवकरात लवकर हा शो पर्यटकांना पाहता यावा, असा प्रयत्न आहे.

– श्रीनिवास कंदूल,

मुख्य अभियंता, विद्युत विभाग,

पुणे महापालिकाSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here