Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Homeअतिवेग, लेन कटिंग करणाऱ्यांना चाप
Array

अतिवेग, लेन कटिंग करणाऱ्यांना चाप


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर लेन कटिंग करून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या सहा हजारांहून अधिक वाहनांवर महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली असून, ६२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. अतिवेग आणि बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या जवळपास ७० हजार वाहनचालकांवरही कारवाई केली आहे.

एक्स्प्रेस वेवर होणाऱ्या अपघातांना ब्रेक लावण्यासाठी गेल्या काही वर्षांत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत दंडात्मक कारवाईत सातत्य ठेवण्यात आले. गेल्या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे लॉकडाउन करण्यात आले होते. परिणामी, एक्स्प्रेस वेवरील वर्दळ घटली होती. आता चालू वर्षात वर्दळ वाढली असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी या वर्षात ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत अतिवेगात वाहन चालविणाऱ्या ६९ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कार आणि हलकी मालवाहू वाहने यांचा समावेश आहे. तर, लेन कटिंगची कारवाई सहा हजार २५५ वाहनचालकांवर करण्यात आली असून, ही सर्व अवजड वाहने आहेत.

एक्स्प्रेस वेवर २०१८ मध्ये ९६ प्राणांतिक अपघात झाले होते. तर, २०१९ मध्ये ७४ आणि २०२० मध्ये ६२ प्राणांतिक अपघात झाले होते. यानुसार सलग दोन वर्षे अपघातांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत १९ प्राणांतिक अपघात झाले होते. यंदा त्याच काळात ३४ प्राणांतिक अपघात झाले आहेत. या संबंधीचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध करून वाढत्या अपघातांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी कारवाईची मोहिम हाती घेतली.

महत्त्वाचे आकडे

~ ५००

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना आकारण्यात येणारा दंड

~ १०००

लेन कटिंगचा दंड

५५ ते ६० हजार

एक्स्प्रेस वेवरून दैनंदिन होणारी वाहतूक

(ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२१ दरम्यानची आकडेवारी)

६,२५५

लेन कटिंगप्रकरणी कारवाई केलेली वाहने

६९,०००

अतिवेग, बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केलेली वाहने

…………….

एक्स्प्रेस वेवरील वेग मर्यादा

१०० किलोमीटर/प्रतितास

हलक्या वाहनांसाठीची वेगमर्यादा

८० किलोमीटर/प्रतितास

जड वाहनांसाठी वेरमर्यादा

…………….Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments