Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर…

Array
महाराष्ट्रातले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पंजाबमध्ये सह प्रभारी म्हणून नियुक्ती

महाराष्ट्रातले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पंजाबमध्ये सह प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानचे मंत्री हरीश चौधरी यांची पंजाबचे प्रभारी नेमले गेले आहेत.  त्यांच्या सोबतीला दोन सहप्रभारी पंजाबमधली सत्ता राखणं काँग्रेससमोरचं मोठे आव्हान असणार आहे

परमबीर सिंह यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची प्रक्रिया सुरु

गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसा पत्रव्यवहार सीआयडीने केंद्रीय गृहमंत्रालयासोबत सुरु केला आहे. ते देशाबाहेर जाऊ नयेत यासाठी ही नोटिस बजावण्यात येणार आहे.

सावंतवाडी नगरपरीषदेची सभेत सेना-भाजप नगरसेवकां मध्ये बाचाबाची

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेच्या बैठकीत राडा पाहायला मिळाला. या बैठकीदरम्यान शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले. बरं एवढ्यावरच ते शांत झाले नाहीत, तर एकमेकांच्या अंगावर धावून गेले. राज्यात शिवसेना भाजपचा सध्या जोरदार संघर्ष सुरु आहे. पण हा संघर्ष आता अगदी तालुका पातळीवर जाऊन पोहोचलाय. जिओ केबल टाकण्यासाठी शहरात खोदलेले खड्डे, काही वार्डात कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा आणि सांडपाण्याचा प्रश्न आदी अनेक विषयावर नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभेत शिवसेना आणि सत्ताधारी भाजप नगरसेवकांमधे बाचाबाची होऊन नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

तुळजापूरात रोज सव्वा लाख भाविक

नवरात्रीशिवाय होणार्यी गर्दीचे तुळजाभवानी मंदिरात सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मागील आठ दिवसांपासून दररोज सव्वालाख भाविकांचे दर्शन घेत आहेत. कोरोना आपत्कालीन परिस्थिती निवळल्यानंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. मागील आठ दहा दिवसांपासून दीपावलीच्या सुट्ट्या आणि कोरोना नंतरचे दर्शन घेण्याची भाविकांची आतुरता या दोन्ही बाबीमुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दररोज दर्शनासाठी सव्वा लाख भाविकांची गर्दी होत आहे. भाविकांच्या चारचाकी वाहनांना पार्किंग करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि पारंपारिक कुलधर्म कुलाचार करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here