Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Kiran Gosavi: किरण गोसावीला पोलिसांचा मोठा धक्का; दुबईतून परतताच ‘या’ महिलेला अटक

Array


हायलाइट्स:

  • किरण गोसावीला पुणे पोलिसांचा मोठा धक्का.
  • फसवणुकीच्या प्रकरणात आणखी एक अटक.
  • महिला साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पुणे: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आणि फसवणुकीच्या एका प्रकरणात अटकेत असलेला किरण गोसावी याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पुण्यातील ज्या प्रकरणात किरण गोसावीला अटक करण्यात आली आहे त्याच प्रकरणात त्याची साथीदार कुसुम गायकवाड हिला आज पोलिसांनी अटक केली. याशिवाय भोसरी पोलीस ठाण्यात किरण गोसावीविरुद्ध आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ( Kiran Gosavis Aide Kusum Gaikwad Arrested )

वाचा:ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठ्या घडामोडी; SITने मुंबईबाहेर नोंदवला आर्यनचा जबाब

सध्या राज्यभरासह देशात चर्चेत असलेल्या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावी हा एनसीबीचा एक पंच साक्षीदार आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. तो सध्या जामिनावर सुटला असला तरी आर्यनवर गुन्हा दाखल होऊ नये आणि त्याची सुटका करण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागण्यात आली होती, असा आरोप करण्यात आला आहे. यात मुख्य आरोप किरण गोसावी याच्यावरच आहे. त्यामुळे तो आधीच गोत्यात आलेला असताना त्याची अनेक फसवणुकीची प्रकरणं समोर आली आहेत. त्यातील पुणे येथे दाखल एका गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याच प्रकरणात गोसावीला मदत करणारी महिला साथीदार कुसुम गायकवाड हिला आज पुण्यातील लष्कर पोलिसांनी अटक केली. एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून एक लाख तीस हजार रुपये घेतल्या प्रकरणी किरण गोसावी व कुसुम गायकवाड यांच्यावर हा गुन्हा दाखल असून लष्कर पोलिसांनी कुसुम हिला दुबईतून परतल्यावर अटक केली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी माहिती दिली.

वाचा: ड्रग्ज पार्टी: वाढदिवसाआधी आर्यन खानची NCB कार्यालयात हजेरी; कारण…

गोसावीवर आणखी एक गुन्हा दाखल

किरण गोसावी विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदेशात नोकरी लावण्याच्या आमिष दाखवत त्याने सव्वादोन लाखांची फसवणूक केली आहे. विजयकुमार सिद्धलिंग कानडे यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण गोसावीने कानडे यांना ब्रुनेई येथे नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे.

वाचा: मलिक यांच्या निशाण्यावर कंगना; ‘ओवरडोस’ शब्द वापरत म्हणाले…Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here