Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Home'सत्तर वर्षे हळहळणाऱ्या भारतमातेच्या चेहऱ्यावर २०१४ पासून हास्य फुलले!'; आता 'हे' महाराज...
Array

‘सत्तर वर्षे हळहळणाऱ्या भारतमातेच्या चेहऱ्यावर २०१४ पासून हास्य फुलले!’; आता ‘हे’ महाराज बोलले


हायलाइट्स:

  • भारतमातेच्या चेहऱ्यावर २०१४ पासून हास्य फुलले.
  • गोविंददेवगिरी महाराज यांचे पुण्यात विधान.
  • भाववाढीवरून ओरडणाऱ्या लोकांची काढली लाज.

पुणे: देशातील निवडणुका कांदा, बटाटा, पेट्रोल, डिझेल यांच्या भाववाढीवरून होतात. भाववाढीवरून ओरडणाऱ्या लोकांना लाज वाटायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देश प्रगती करत असताना लोकांनी महागाई सहन केली पाहिजे, असा सल्ला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज (किशोर व्यास) यांनी शुक्रवारी दिला. सत्तर वर्षे झोळी पसरणारा देश आता जगाला लस देत आहे. ७० वर्षे हळहळणाऱ्या भारतमातेच्या चेहऱ्यावर २०१४ पासून हास्य फुलले आहे, असे विधान करत त्यांनी केंद्रातील मोदी सरकारची यावेळी स्तुती केली. ( Govind Dev Giri Maharaj On Modi Govt )

वाचा: मलिक यांच्या निशाण्यावर कंगना; ‘ओवरडोस’ शब्द वापरत म्हणाले…

विवेक समूहातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मिलिंद आणि शिल्पा सबनीस लिखित ‘समग्र वंदे मातरम’ या हिंदीत अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन गोविंददेवगिरी यांच्या हस्ते झाले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) व्यवस्थापकीय संचालक दीपक सावंत, एनवायसीएसचे अध्यक्ष राजेश पांडे, हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, विश्वस्त धनंजय काळे, अनुवादक गंगाधर ढोबळे, विवेक समूहाचे समन्वयक महेश पोहनेकर उपस्थित होते. देश म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही. देशाला मातेचा दर्जा असून वंदे मातरम म्हणजे तिला नमन आहे. वंदे मातरम या काव्यात भविष्य घडविण्याचे तेज आहे. केंद्रातील सत्तेपाशी साम्यवादी लोक होते म्हणून रामसेतू कोणी बांधला नाही, असे बिंबवले जात होते, असे गोविंददेवगिरी यांनी सांगितले.

वाचा: ड्रग्ज पार्टी: वाढदिवसाआधी आर्यन खानची NCB कार्यालयात हजेरी; कारण…

पाटील म्हणाले, ‘स्वातंत्र्य कसे मिळाले, पारतंत्र्य म्हणजे काय हे नवीन पिढीला कळले पाहिजे. भाजपचे लोक वंदे मातरम आणि भारत माता की जय असे सतत म्हणतात, अशी चेष्टा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांना ही ताकद माहीत नाही.’

राज्य सरकार निर्दयी

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याशी आमचा संबंध नाही. सरकार तोडगा काढत नाही. उलट कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाते. आंदोलनाचे श्रेय कोणालाही मिळो; पण कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. काही झाले की भाजप किंवा संघाचा हात आहे, असे म्हणायची सवय झाली आहे. हे सरकार निर्दयी आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद मालेगावमध्ये उमटण्याचे काय कारण ? मालेगाव येथे सरकार पोलिसी बळाचा वापर करत आहे. अशाने सरकारला धक्का बसेल, असे पाटील म्हणाले. कंगना राणावतचे वक्तव्य चुकीचे असून मोदी सरकारसंबंधीचे विधान काही अंशी बरोबर आहे, असे ते म्हणाले.

वाचा: किरण गोसावीला मोठा धक्का; दुबईतून परतताच ‘या’ महिलेला अटकSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments