Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

लसीकरणाला ‘ब्रेक’

Arrayम. टा. प्रतिनिधी,

गेल्या तीन-चार महिन्यांच्या तुलनेत नोव्हेंबरच्या पहिल्या १० दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग एकदम मंदावला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत (सप्टेंबर आणि ऑक्टोबर) २० लाखांच्या आसपास लसीकरण झाले असून, नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अवघे दीड लाखच लसीकरण झाले आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

‘कोव्हिड-१९’चा संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरणामध्ये अडथळे निर्माण झाल्यानंतर जून-जुलैपासून ते सातत्याने वाढल्याचे दिसून आले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या क्षेत्रांत सुरुवातीला वेगाने लसीकरण झाले असून, गेल्या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतही लसीकरणाला अपेक्षित वेग प्राप्त झाला होता. करोनाची साथ हळूहळू नियंत्रणात येत असतानाच सणासुदीच्या काळाचा फटका लसीकरण मोहिमेला बसला आहे. दिवाळीदरम्यान शहरातील लसीकरण काही दिवस पूर्ण बंद ठेवण्यात आले होते. भरीस भर म्हणून जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतही नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

करोनाचा संसर्ग कमी होत असल्याने नागरिकांकडून दुसरा डोस घेण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील १० लाख नागरिकांची दुसऱ्या डोसची मुदत जवळ आली आहे, तर काहींची मुदतही उलटून गेली आहे. जिल्ह्यात लशींचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही लसीकरणाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या उर्वरित दिवसांमध्ये लसीकरणाला पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आरोग्य विभागाला पावले उचलावी लागणार आहेत. याशिवाय पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनाही त्यांच्या हद्दीतील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवावा लागणार आहे.

दुसऱ्या डोसला प्राधान्य हवे

जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी जुलै-ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात लस घेतल्याने ८४ दिवसांनंतर त्यांनी दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत झालेल्या लसीकरणात दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. दीड लाखांपैकी एक लाख १२ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, केवळ ३८ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तरीही दुसरा डोस घेणाऱ्यांच्या प्रमाणात आणखी वाढ होणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

गेल्या चार महिन्यांतील लसीकरण

जुलै १७,८१,५६१

ऑगस्ट १८,७८,०४४

सप्टेंबर २४,३७,१४१

ऑक्टोबर १५,९७,३२६

नोव्हेंबर १,५०,७५२ (१० नोव्हेंबरपर्यंत)

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लशीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण करायला हवे. ८४ दिवसांचा कालावधी विचारात घेतला, तर या महिन्यात पुढील कोष्टकानुसार नागरिकांनी त्यांचा दुसरा डोस पूर्ण करण्याची गरज आहे.

पहिल्या डोसची तारीख दुसरा डोस

१० ऑगस्ट २ नोव्हेंबरनंतर केव्हाही

१५ ऑगस्ट ७ नोव्हेंबरनंतर केव्हाही

२० ऑगस्ट १२ नोव्हेंबरपासून पुढे

२५ ऑगस्ट १७ नोव्हेंबरपासून पुढे

३० ऑगस्ट २२ नोव्हेंबरपासून पुढे

(ऑगस्टपूर्वी जुलै किंवा जून महिन्यांत पहिला डोस घेतल्यानंतर अद्याप दुसरा डोस न घेणाऱ्या नागरिकांनी तातडीने जवळच्या केंद्रावर जाऊन लसीकरण पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.)Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here