Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Homeबंडलबाज नवरी! अंध व्यक्तीसोबत केलं लग्न, ७ महिने संसार केला आणि मग...
Array

बंडलबाज नवरी! अंध व्यक्तीसोबत केलं लग्न, ७ महिने संसार केला आणि मग…


पुणे: पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेने अंध व्यक्तीशी लग्न केल्यानंतर अवघ्या सात महिन्यांनंतर पळून गेली. धक्कादायक म्हणजे, तिने घरातून पळून जाताना दागिने आणि पैसे घेऊन गेली. हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली व्यक्ती आरबीआयमध्ये काम करते. ते अंध आहेत. या प्रकरणी त्यांनी विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कैलास कुमार सिंघवी, सारिका बंब, नंदलाल, कमला आणि राजू कोठारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयमध्ये काम करणारी व्यक्ती अंध असल्याने लग्न जमत नव्हते. मध्यस्थांमार्फत त्यांना लग्नासाठी स्थळ आले होते. सारिका बंब असे तिचे नाव होते. लग्न करायचे असेल तर, मुलीच्या कुटुंबीयांना पैसे द्यावे लागतील, असे मध्यस्थांनी फिर्यादीला सांगितले होते. त्यामुळे वेळोवेळी त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना आठ लाखांहून अधिक रुपये दिले. काही दिवसांपूर्वीच फिर्यादी आणि सारिकाचे लग्न झाले होते. लग्न होऊन सात महिने झाले. सात महिन्यांचा संसार केल्यानंतर मुलीने घरातून दागिने आणि रोकड घेऊन पोबारा केला.

फिर्यादीने तिच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने परत येण्याचे आश्वासन दिले. पण ती काही परत आलीच नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिच्यासह पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments