Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

प्रायोगिक नाटकांची आजपासून पर्वणी

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रायोगिक नाटकांच्या दोन महोत्सवांची पर्वणी रसिकांना आज, शुक्रवारपासून तीन दिवस अनुभवता येणार आहे. करोनाकाळात आर्थिक आणि सृजनात्मक दृष्ट्या तोटा सहन केल्यानंतर प्रायोगिक रंगभूमी नव्या सर्जनशील आविष्काराला आणि रसिकांच्या स्वागताला सज्ज झाली आहे.

महाराष्ट्र कल्चरल सेंटर‘ने उत्कृष्ट साहित्यकृतींवर आधारित नवीन नाटकांची निर्मिती करून ‘अनलॉक फेस्टिवल’ आयोजित केला आहे. संस्थेच्या ज्योत्स्ना भोळे सभागृहात रंगणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन रमेश इंगळे ऊत्रादकर यांच्या हस्ते सायंकाळी सात वाजता होणार आहे. रमेश इंगळे उत्रादकर यांच्या ‘सर्व प्रश्न अनिवार्य’ या कादंबरीची रंगावृत्ती याच नावाने कृतार्थ शेवगावकर याने तयार केली असून, अपूर्व साठे ती दिग्दर्शित करत आहे. जी. ए. कुलकर्णी यांच्या प्रदक्षिणा या कथेवर आधारित ‘अनुदिन अनुतापे’ हा दीर्घांक प्रमोद काळे यांनी लिहिला असून, दिग्दर्शनही त्यांचेच आहे. नील सायमनच्या ‘प्रिझनर्स ऑफ सेकंड ॲव्हेन्यू’ यावर आधारित ‘एरर कोड १००५’ हे नाटक सचिन जोशी दिग्दर्शित करत असून, रूपांतर अपूर्व साठे यांनी केले आहे. ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’चे ३० कलाकार या नाटकांमध्ये काम करणार आहेत, अशी माहिती सेंटरच्या शुभांगी दामले यांनी दिली.

कर्वे रस्त्यावरील ‘द बॉक्स’ येथे आज, शुक्रवारपासून ‘आयपार आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव’ रंगणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या हस्ते सायंकाळी सात वाजता होणार आहे. आज ‘वेज टू डील विथ मॉन्स्टर्स इन युअर कबर्ड’, ‘कॉन्स्टंट अॅक्ट्स ऑफ डिसओबेइंग’, ‘तो पहा तो आहे’ आणि ‘डार्विन’ हे नाट्यप्रयोग होणार आहेत. कुमार जोशी स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यवाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण शैलजा जोशी यांच्या हस्ते होणार आहे. प्रयोग प्रत्यक्ष नाट्यगृहात तर कार्यशाळा आणि इतर उपक्रम ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. http://festival.iapar.in/booking/ या संकेतस्थळावर सशुल्क प्रवेशिका उपलब्ध आहेत, अशी माहिती ‘आयपार’चे संस्थापक विद्यानिधी वनारसे यांनी दिली.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here