Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

कंगना… ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’, Kangana Ranaut च्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावर देशभरातून संताप

ArrayNawab Malik Press Conference : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर (Kangana Ranaut) हल्लाबोल केला आहे. स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाचा पद्म पुरस्कार तात्काळ काढून घेऊन, तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. कंगना रनौतने भारताला 1947 भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ईडीनं पुण्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीवर टाकलेल्या छाप्याबाबत स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांनी कंगाना रणौतच्या वक्त्यव्याचाही समाचार घेत पद्म पुरस्कार माघारी घेण्याची मागणी केंद्राकडे केली. नवाब मलिक यांच्याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पत्रकार परिषद घेत कंगानाच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत पद्म पुरस्कार माघारी घेण्याची मागणी केली होती.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here