Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Homeएसटी संपावरून पुण्यात नाट्य
Array

एसटी संपावरून पुण्यात नाट्य


म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मोडीत काढण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांनी अडवणूक सुरू केली असून, दुसरीकडे एसटी कामगारांनी खासगी वाहतूकदारांवर रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर पुण्यात एक प्रकारचे नाट्य रंगले होते.

स्थानकातील आरामकक्ष बंद करून सामान रस्त्यावर आणले होते, तर खासगी वाहतूकदारांच्या गाड्यांवर ठिकठिकाणी दगडफेक झाल्याने वाहतूकदारांनी एसटी स्थानकातील वाहतूक काही काळासाठी बंद केली होती.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरूच होता. कर्मचाऱ्यांना न्यायालयामार्फत नोटीस पाठवणे, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणे, यासह मुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांना निवेदने पाठवूनही कर्मचारी संघटनांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून महामंडळाने गुरुवारी कठोर पाऊल उचलले. स्वारगेट आणि शिवाजीनगर एसटी स्थानकातील कर्मचाऱ्यांसाठीचे आराम कक्ष बंद करून, त्यात कर्मचाऱ्यांनी ठेवलेले सामान बाहेर रस्त्यावर ठेवण्यात आले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. महामंडळाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केले.

खासगी वाहतूकदार एसटी स्थानकातून वाहतूक करीत आहेत, या गोष्टीला एसटी कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळेच बुधवारी सायंकाळी कोल्हापूर विभागात एसटी कर्मचाऱ्यांनी काही खासगी वाहतूकदारांच्या बसवर दगडफेक करून वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न केला. परिणामी, खासगी वाहतूकदारांनी गुरुवारी सकाळी एसटी स्थानकात बस नेण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे प्रवासी पुन्हा गोंधळात पडले होते.

‘आरटीओ’च्या मध्यस्थीने वाहतूक सुरू

खासगी वाहतूकदारांनी एसटी स्थानकातून वाहतूक बंद केल्याने प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून एसटी प्रशासन आणि वाहतूकदारांचे प्रतिनिधी यांची बैठक घडवून आणली. या वेळी वाहतूकदारांना सुरक्षेची हमी दिल्यानंतर त्यांनी स्थानकातून पुन्हा वाहतूक सुरू केली. मात्र, बुधवारच्या तुलनेत बसची संख्या कमी असल्याचे दिसून आले.

पुण्यातील १३८ कर्मचाऱ्यांचे निलंबन

संप मागे घेण्याचे आवाहन करूनही संप सुरू ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. गुरुवारी राज्यातील एक हजार १३५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यात पुणे विभागातील सुमारे १३८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यात दोन हजार ५३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

‘भाजप’ कार्यकर्त्यांनी अडवल्या गाड्या?

स्वारगेट स्थानकातून सुटणाऱ्या खासगी वाहतूकदारांच्या गाड्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडवल्याची जोरदार चर्चा स्थानकातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये होती. भाजपकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला आहे.Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments