Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Kartiki Ekadashi 2021 : ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

Array


 पंढरपूर : ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 65 वर्षांवरील भाविकांनाही पंढरपूरच्या मंदिरात दर्शन घेता येणार आहे. प्रशासनानं कोरोना काळातील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात गर्भवती महिलांनाही दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. कोरोना काळातील  निर्बंध शिथिल केल्यानं वारकऱ्यांकडून या निर्णयाचं जोरदार स्वागत होत आहे.

कोरोनाच्या संकटानंतर होत असलेल्या कार्तिकी यात्रेसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून भाविकांची यात्रा सुखरूप करण्यासाठी तब्बल साडे सात हजार अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. यंदा ठाकरे सरकारने कार्तिकी यात्रा भरवण्यास परवानगी देताना 65 वर्षांपुढील वारकरी, गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी असणारे निर्बंध उठविल्याने या सर्व घटकांना आता कार्तिकी यात्रेत सहभागी होता येणार आहे. 

ABP Impact : कार्तिकी यात्रेनंतर देवाचे सोने चांदी वितळवून केल्या जाणार विटा, 36 वर्षाचा जुना प्रश्न सुटला 

विठ्ठल भक्तांमध्ये सर्वात जास्त संख्या ही 65 वर्षांपुढील वारकऱ्यांची असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या भाविकांना आपल्या लाडक्या विठुरायाला पाहता आले नव्हते त्यांनाही यंदा कार्तिकीचा आनंद घेता येणार आहे.  विठुरायाच्या दर्शनासाठी गोपाळपूरपर्यंत दर्शन रांग उभी करण्यात आली असून भाविकांचे निवास तळ अशी ओळख असलेल्या 65 एकराची सफाई देखील पूर्ण करण्यात आली आहे. येथे जवळपास 350 प्लॉटवर उद्यापासून भाविकांना, दिंड्यांचे राहुट्या टाकून मोफत निवास करता येणार आहे. याच पद्धतीने चंद्रभागेत स्नानासाठी वाहते पाणी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.  उद्या पर्यंत चंद्रभागेमध्ये पाणी येणे अपेक्षित आहे. यंदा चंद्रभागेमध्ये महिला भाविकांना स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या चेंजिंग रूम उभारण्यास सुरुवात झाली आहे.

ST Workers Strike : एसटी संपामुळे वारकऱ्यांना कार्तिकी यात्रेची वाट खडतर, रेल्वेने सोडल्या दोन जादा गाड्या 

कार्तिकीचे वैशिष्ट्य असणारी वाळवंटातील किर्तनसेवा यंदा होणार असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. सध्या एसटीच्या संपाचा फटका विठ्ठल भक्तांना बसत असला तरी एसटीचा संप लवकर मिटून आपल्याला कार्तिकीला जात येईल अशीच अपेक्षा वारकरी संप्रदाय करत आहे. नियम आणि अटींचं पालन करून 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे यात्रेची प्रतीक्षा करणाऱ्या वारकऱ्यांना यावेळी पंढरपूरच्या यात्रेला जाता येणार आहे. या यात्रेला किमान 5 ते 6 लाख भाविक येतील अशी अपेक्षा असून त्यादृष्टीनं दर्शन व्यवस्था करण्यात आलीय. कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे.

Kartiki Ekadashi 2021 : कार्तिकी यात्रेसाठी वारकऱ्यांमध्ये उत्साह, यात्रेची तयारी अंतिम टप्प्यातSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here