Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! धरणे भरूनही पाणीसाठा कमी

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणारी चार प्रमुख धरणे पावसाळ्यामध्ये शंभर टक्के भरली असूनही, ऑक्टोबर महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने यंदा पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. वरसगाव, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार धरणांमध्ये सध्या २७.३८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे सुमारे ९४ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दीड टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले असून, पुणे महापालिकेला याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे.

चारही प्रमुख धरणे सप्टेंबर महिन्यात पूर्ण क्षमतेने भरली. मात्र, ऑक्टोबर महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नाही. त्यामुळे धरणे शंभर टक्के भरली असतानाही सध्याचा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत २८.८० टीएमसी म्हणजे सुमारे ९९ टक्के पाणीसाठा होता. यंदा २७.३८ टीएमसी पाणीसाठा असल्याने सुमारे दीड टीएमसी पाणीसाठा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

सध्या वरसगाव धरणात १२.५१ टीएमसी म्हणजे अंदाजे ९८ टक्के पाणीसाठा, पानशेत धरणात १०.५७ टीएमसी म्हणजे सुमारे ९९ टक्के, टेमघर धरणात ३.५७ टीएमसी म्हणजे सुमारे ९६ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, खडकवासला धरणात ०.७२ टीएमसी म्हणजे जेमतेम ३७ टक्के पाणीसाठा आहे.

जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे म्हणाले, ‘खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे यंदा शंभर टक्के भरली होती. मात्र, गेल्या महिन्यांत पावसाने ओढ दिली. त्यामुळे पाणीसाठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. ग्रामीण भागात वर्षभरात पाच वेळा कालव्यातून पाणी सोडणे अपेक्षित आहे. मात्र, पुण्यातील पाण्याची मागणी वाढली असल्याने सध्या सिंचनासाठी तीन आवर्तने घेण्यात येतात. यंदा पाणीसाठा कमी असला, तरी ग्रामीण भागात शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडावे लागणार आहे. यंदा पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी पुणे महापालिकेला पत्र पाठविण्यात आले आहे. पुणे महापालिकेने भामा आसखेड धरणातून पूर्व भागासाठी पाणी घेतल्यानंतर तेवढे पाणी खडकवासला धरणातून कमी घ्यावे, असे कळविण्यात आले आहे.’

‘कालव्यातून पाणी सोडणार’

‘जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत पहिले आवर्तन घेतले जाणार आहे. त्यानंतर उन्हाळी आवर्तनही घ्यावे लागणार आहे. पुण्याला पिण्यासाठी पाणीपुरवठा करताना शेतीसाठीही पाणी देणे आवश्यक आहे,’ असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी सांगितले.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here