Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

कुठे आहेत लोकप्रतिनिधी?; लस उपलब्धतेबाबत तक्रारी, आता मात्र दुर्लक्ष

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणेः अगदी काही महिन्यांपूर्वी प्रभागातील नागरिकांना लस देण्यासाठी संपूर्ण लसीकरण केंद्र ‘हायजॅक’ करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मतदारांचा दुसरा डोस पूर्ण व्हावा, याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. सुरुवातीला शाळांपासून ते समाज मंदिरांपर्यंत लसीकरण केंद्रे खुली करण्यासाठी आग्रह धरणाऱ्या अनेक माननीयांनी प्रभागातील नागरिकांनी दोन्ही डोस घेतले का, किती नागरिकांचा दुसरा डोस राहिला आहे, याचा आढावा घेणे थांबविले आहे.

लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला लशींचा अपुरा पुरवठा होत असल्याने त्याविरोधात आवाज उठविण्यात आला होता. लशींची उपलब्धता वाढल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात लस मिळायला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे उघडण्यात आली. या सर्व ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होता. त्याविरोधात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. सुरुवातीला प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्याची बॅनरबाजी करणाऱ्या या लोकप्रतिनिधींनी पहिला डोस घेतलेल्या सर्व नागरिकांचा दुसरा डोस झाला का? दुसऱ्या डोसची मुदत केव्हा आहे; तसेच ती मुदत उलटून गेलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जवळच्या केंद्रांवर लस आहे का, याकडे साफ दुर्लक्षच केले आहे.

दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांचा कालावधी असल्याने आता लसीकरणास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक जण दुसरा डोस घेण्यास कंटाळा करीत असल्याचे जाणकारांचे मत आहे. लसीकरणाच्या अगदी सुरुवातीला फेब्रुवारी-मार्चमध्ये लशींचा मुबलक पुरवठा होत नव्हता. त्या वेळी लसीकरणासाठी रांगा लागलेल्या असायच्या. अपॉइंटमेंट ‘बुक’ करण्यापासून ते त्या मिळण्यापर्यंत आणि प्रत्यक्षात लसीकरणापर्यंत पुणेकरांच्या विविध प्रकारच्या तक्रारींच्या स्वरूपात प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर लस उपलब्ध होताच स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदारांकडून बॅनरबाजी करून स्थानिक नागरिकांचे लसीकरण करून घेण्यात आले. पहिला डोस झाला खरा; पण दुसऱ्या डोसचे काय, असा सवाल उपस्थित होत असून, त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

‘नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने आता दुसऱ्या डोसनंतर सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस सुरू करावा,’ अशी मागणी वैद्यकतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. दुसऱ्या डोससाठी आता तक्रार करणाऱ्या लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घ्यावा, अशीही सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करणारे लोकप्रतिनिधी आहेत कुठे, असाही सवाल आता विचारला जात आहे.

लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सर्व ‘माननीयां’नी प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण करून घेतले. त्याची बॅनरबाजीही केली; परंतु नागरिकांचा दुसरा डोस वेळेत पूर्ण व्हावा, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले पाहिजे; पण लोकप्रतिनिधींचा उत्साह कमी झाला असून, लसीकरण पूर्ण करून घेण्यात ते कमी पडत आहेत.

– डॉ. अभिजित मोरे,

प्रवक्ते, आपSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here