Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

काँग्रेसमुळेच निवडणूक बिनविरोध नाही; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांचा आरोप

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणेः ‘पीएमआरडीए’च्या पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक ही केवळ काँग्रेसमुळेच बिनविरोध झाली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. काँग्रेसच्या या रणनीतीमुळे आगामी महापालिका निवडणुकांतील आघाडीत मीठाचा खडा टाकण्यात आला असून, ही आघाडी होऊ नये, यासाठी काँग्रेसमधील काही व्यक्ती काम करीत असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नियोजन समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे लढली असून, त्यात आम्हाला यश मिळणार आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे या दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते या निवडणुकीला सामोरे गेले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा आघाडीतील समन्वय अत्यंत चांगल्या प्रकारे राहील, असा दावाही जगताप यांनी केला आहे. काँग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीतील उच्चपदस्थ नेत्यांकडून घेण्यात येईल. मात्र, ‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत आघाडी करण्याची मानसिकता काँग्रेसकडून दाखविण्यात आली नसल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये या निवडणुकीसाठी २२ जागांसाठी २३ अर्ज आले होते. या दोन्हीही महापालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि ‘राष्ट्रवादी’चे संख्याबळ पाहता याच तिन्ही पक्षांचे उमेदवार निवडून येणार होते. त्यामुळे काँग्रेसला जिल्ह्यातून एक जागा देण्याचा प्रस्ताव त्यांना देण्यात आला होता; तरीही काँग्रेसने एक अर्ज भरून ही बिनविरोध होणारी निवडणूक मतदानाद्वारे घेतली. महाविकास आघाडीत एकवाक्यता असणे यासाठी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांकडून भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र, काँग्रेसमधील काही मंडळींची आघाडीत जाण्याची मानसिकता नसल्याने केवळ दोन-अडीच महिन्यांसाठी असलेल्या या पदासाठी ही निवडणूक होत असल्याची टीका जगताप यांनी केली.

भारतीय जनता पक्ष एकसंधपणे या निवडणुकीला सामोरा गेला आहे. आघाडीतील बिघाडी ही पुणेकरांना लवकर कळली, हे बरे झाले. केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले हे पक्ष आहेत. ते विचारांनी कधीही एकत्र येऊ शकत नाही.

– गणेश बीडकर,

सभागृह नेते, पुणे महापालिकाSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here