Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…

Array

किरण गोसावीला न्यायालयीन कोठडी

किरण गोसावीला पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हाबाबत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आज त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. मात्र लगेच पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी एका गुन्हाबाबत पोलीसांनी त्याला अटक दाखवून त्याचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर किरण गोसावीला उद्या लष्कर पोलीसांच्या ताब्यात दिले जाईल.

खासदार अमोल कोल्हे रविवार पासून संपर्क क्षेत्राबाहेरच!

दिवाळी संपल्यापासून पुण्यातील राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे कोणाच्या ही संपर्कात नाहीत. रविवारी सायंकाळपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जातोय. संपर्काबाहेर जाण्यापूर्वी त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहीले होते,’आता सिंहावलोकनाची वेळ आलीये. गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली.  पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा करण्याची गरज त्यांनी या पोस्ट मधून व्यक्त केली. त्यासाठीच मी एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही. पुन्हा लवकरच भेटू… नव्या जोमाने, नव्या जोशाने. पण हे नमूद करताना फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतन शिबिरासाठी नाही.’ त्यामुळं खासदार अमोल कोल्हेंच्या मनात नेमकं काय आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळासह जनमानसात सुरु झाली. दिवाळी संपली अन तेंव्हापासून आत्तापर्यंत अमोल कोल्हेंचा ना फोन लागतोय, ना त्यांच्या नातेवाईकांना किंवा तिन्ही स्वीय सहाय्यकांना ते कुठं आहेत, हे सांगता येतंय. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी असल्याचं मात्र सांगितलं जातंय. एरवी सोशल मीडियावर त्यांच्या संदर्भात पडणाऱ्या पोस्ट त्यांची सोशल मीडियाची टीम अथवा स्वीय सहाय्यकांकडून टाकल्या जायच्या. पण सिंहावलोकनाची वेळ आल्याची पोस्ट स्वतः खासदार कोल्हेंनी टाकल्याचं त्यांचे स्वीय सहाय्यक सांगतात.

Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here