Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

सिलिंडरचे अनुदान बंद नव्हे; शून्यच

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे: गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान बंद करूनही त्याची घोषणा न करणाऱ्या केंद्र सरकारने याविषयी प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना अधिकच गोंधळात टाकण्याचीच भूमिका घेतली आहे. ‘ट्विटर’च्या माध्यमातून प्रश्न विचारलेल्या नागरिकांना वेगवेगळी उत्तरे देऊन अनुदान बंद झाले की नाही, याचे उत्तर टाळण्याचाच प्रयत्न पेट्रोलियम मंत्रालयाचा असल्याचे दिसून येत आहे.

मे २०२०पासून देशातील गॅस सिलिंडरवरील ८५ टक्के अनुदान बंद केल्याचा प्रकार ‘महाराष्ट्र टाइम्स’ने उजेडात आणला. खात्यावर येणारे अनुदान अचानक काही महिने बंद झाल्याने अनेकांनी समाजमाध्यमांवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, केंद्र सरकारकडून ठोस उत्तर मिळत नव्हते. ‘ट्विटर’वर अनेक नागरिकांनी आपल्या गॅस सिलिंडरच्या पावतीवर ‘अनुदानित सिलिंडर‘ असा उल्लेख करूनही अनुदान का मिळाले नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटरवरून वेगवेगळी उत्तरे देण्यात आली आहेत. एका उत्तरात ‘अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीतील फरक कमी झाल्याने अनुदान शून्य झाले आहे. म्हणून ते जमा झाले नाही,’ अशा जावईशोध मंत्रालयानेच लावला आहे. दुसऱ्या उत्तरात ‘काही मार्केटमध्ये अनुदान शून्य झाल्याने त्याचे वितरण करण्यात आले नाही,’ असे उत्तर देण्यात आले. यावर ठोस उत्तर का देत नाही, असा प्रतिप्रश्नही ग्राहकांनी केला. काही ग्राहकांना ‘आम्ही आपली तक्रार संबंधित कंपनीला पाठवली आहे,’ एवढेच मोघम उत्तर देण्यात आले. अनुदानाविषयी अनेकांनी संबंधित गॅस पुरवठादारांनाही विचारणा केली असता, त्यांनीही कानावर हात ठेवले.

अनुदानित सिलिंडरचा उल्लेख

एकही रुपया अनुदान मिळत नसताना अनेकांच्या सिलिंडरच्या पावतीवर ‘अनुदानित सिलिंडर’ असा उल्लेख दिसून येत आहे. सिलिंडरच्या ऑनलाइन बुकिंग यादीतही अनेक सिलिंडर अनुदानित उल्लेख असतानाही अनुदान मात्र शून्यच आहे.

केंद्र सरकारने शहरी भागातील घरगुती गॅस सिलिंडरच्या अनुदानाच्या निकषात बदल करण्याचा घेतलेला धोरणात्मक निर्णय अयोग्य आहे. मागील केंद्र सरकारच्या काळात आखलेली धोरणे सध्याच्या सरकारने मोडीत काढण्याचा सपाटा चालविला आहे. सध्याचे मोदी सरकार केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून कारभार करीत आहे. त्याची किंमत आगामी काळात त्यांना मोजावी लागणार आहे. सर्वसामान्य ग्राहक महागाईने घायकुतीला आला आहे.

– श्रीरंग बारणे, खासदारSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here