Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

मेट्रो प्रकल्पासाठी १,२४० कोटी; ‘पुणे आयटी सिटी’ पाहणार काम

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी १ हजार २४० कोटी रुपयांचा व्यवहार्यता तफावत निधी (व्हीजीएफ) देण्यास केंद्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे हिंजवडी मेट्रोसमोरील सर्व अडथळे आता दूर झाले असून लवकरच प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचा दावा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे.

हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी जागा ताब्यात येण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या नव्या मेट्रो धोरणानुसार हिंजवडी मेट्रोचा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) स्वरूपात विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून व्यवहार्यता तफावत निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. करोनामुळे हा निधी मिळणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. या संदर्भातील प्रस्ताव पीएमआरडीएने काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारला पाठविला होता. केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीसमोर या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. व्यवहार्यता निधी म्हणून बाराशे कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक सर्व सरकारी जागांचा ताबा नुकताच पीएमआरडीएला प्राप्त झाला आहे. या प्रकल्पासाठी टाटा-सिमेन्स या दोन कंपन्यांची निवड यापूर्वीच करण्यात आली आहे. या कंपन्यांनी माण येथे कारशेडचे; तसेच कास्टिंग यार्डचे काम यापूर्वीच सुरू केले आहे. सर्व जागांचा ताबा आणि केंद्र सरकारकडून व्यवहार्यता तफावत निधीची अंतिम मंजुरी प्रलंबित असल्याने दिवाळीनंतर या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात दिले होते. या कामाला विलंब होत असल्याने खासदार गिरीश बापट यांनी सात दिवसांत काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

आकडे बोलतात…

८,३०० कोटी रुपये

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा एकूण खर्च

१२४० कोटी रुपये

केंद्र सरकारकडून मिल मारा व्यवहार्यता तफावत निधी

१२०० कोटी रुपये

राज्य सरकारकडून निधीऐवजी तेवढ्याच किमतीच्या जागांचा ताबा

५९००-६००० कोटी रुपये

टाटा-सिमेन्स कंपनीकडून कर्जाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणारा निधी

‘पुणे आयटी सिटी’ पाहणार काम

– हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी टाटा-सिमेन्स यांनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल या कंपनीची स्थापना केली आहे.

– मेट्रो प्रकल्पाचे यापुढील सर्व काम याच कंपनीतर्फे केले जाणार आहे.

– आचार्य आनंदऋषिजी चौकात वाहने आणि मेट्रोसाठी बहुमजली उड्डाणपूल उभे करण्याचे आव्हान कंपनीसमोर आहे.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here