Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

‘फायर ऑडिट’ पूर्ण; राज्यातील सरकारी रुग्णालयांसाठी २१८ कोटींचा निधी देणार

Array


[email protected]

Tweet : @mustafaattarMT

पुणे : पुण्यासह राज्यातील ५२६ सरकारी रुग्णालयांपैकी ५१९ रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट‘ पूर्ण झाली आहे. त्रुटी असलेल्या रुग्णालयांची स्थिती सुधारण्यासाठी २१८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

नगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा राज्यातील रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’चा आणि रुग्णांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा; तसेच जिल्हा रुग्णालये आणि महिला रुग्णालयांतील रुग्णांच्या सुरक्षेबरोबरच ‘फायर ऑडिट’च्या प्रक्रियेला वेग आला आहे. आरोग्य खात्याने काही महिन्यांपूर्वी राज्यातील ५० खाटांच्या पुढील सर्व ग्रामीण रुग्णालये, महिला रुग्णालये; तसेच उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांना ‘फायर ऑडिट’ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बहुतांश सरकारी रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ पूर्ण झाले आहे.

‘राज्यातील ५२६ सरकारी रुग्णालयांपैकी ५१९ रुग्णालयांचे फायर ऑडिटचे काम पूर्ण झाले आहे. त्यात नवीन सरकारी रुग्णालयांचाही समावेश आहे. अनेक रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यात प्रामुख्याने अलार्म नसणे, स्प्रिंकलर्सचा अभाव, फायर फायटिंग यंत्रणा कार्यान्वित न करणे, इमारतीचे दरवाजे छोटे असणे आदी त्रुटी आढळल्या आहेत. ही दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने २१८ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. स्थानिक जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) संबंधित जिल्ह्यांमधील सरकारी रुग्णालयांच्या फायर फायटिंग यंत्रणेची पूर्तता करण्यासाठी आता निधी दिली जाणार आहे. अनेक ठिकाणच्या स्थानिक जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर होण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यापैकी काही ठिकाणी निधी वितरित झाला असून, उर्वरित ठिकाणी निधी लवकरच निधी देण्यात येईल,’ अशी माहिती आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

एकूण निधीपैकी ५० टक्के निधी देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये फायर फायटिंग यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्रुटींची पूर्तता करण्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात फायर सेफ्टी ऑफिसर?

नगर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील आगीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फायर फायटिंगची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी निधी देण्याची घोषणा केली आहे. ‘राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये फायर सेफ्टी ऑफिसरची पदनिर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगीच्या घटनांना सामोरे जाण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच, मॉक ड्रिलही करण्यात येईल. याबाबत पुढील आठवड्यात सविस्तर बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे,’ असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सरकारी रुग्णालयांची स्थिती

३८७

ग्रामीण रुग्णालय (३० खाटा)

५६

उपजिल्हा रुग्णालय (५० खाटा)

२५

उपजिल्हा रुग्णालय (१०० खाटा)

सामान्य रुग्णालय (२०० खाटा)

११

महिला रुग्णालय

३५

जिल्हा रुग्णालये

(स्रोत : आरोग्य विभाग)Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here