Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

निवडणुकीसाठी तिसरी आघाडी; महाविकास आघाडीत फूट पडल्याची चिन्हे

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पीएमआरडीए’च्या पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी आज, बुधवारी होणाऱ्या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत फूट पडल्याची चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची ‘तिसरी आघाडी’ झाली असून, त्यांच्याकडून एकत्रितपणे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून जोरदार हालचाली करण्यात आल्या आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ३० सदस्यपदांसाठी आज, बुधवारी निवडणूक होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या मोठ्या नागरी मतदारसंघातून त्यापैकी २२ जागा लढविण्यात येत आहे. या २२ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात २३ नगरसेवक असून, त्यातील १४ जण पुणे महापालिकेतील आहेत. त्यामुळे या निवडणुकीचे केंद्र पुणे महापालिका ठरली असून, मंगळवारी दिवसभर भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षकार्यालयात नगरसेवकांना मतदान कसे करायचे, याची रंगीत तालीम त्यांच्याकडून करून घेण्यात येत होती.

‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत शिवसेनेकडे पुण्यात १०, तर पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ अशी १९ मते आहेत. त्यापैकी पहिल्या पसंतीची किमान १६ मते ही शिवसेनेच्या उमेदवारालाच देण्यात यावी, असा आदेश या नगरसेवकांना देण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वाधित सुरक्षित समजला जाणारा उमेदवार हा शिवसेनेचा आहे. त्यानंतर भाजपकडे १७२ मते असून, त्यांचे १४ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच्या सर्व या मतदारांनी मतदान केले आणि निवडून येण्यासाठी १३ मतांचा कोटा निश्चित झाला, तर एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी द्वितीय पसंतीच्या मतांची गरज पडू शकते. यासाठी भाजपकडून अत्यंत काटेकोरपणे मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. आपली मते फुटणार नाहीत, यासाठी दक्षता घेण्यात येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी संपर्क ठेवण्यात आला आहे. सभागृह नेते गणेश बीडकर, भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे आणि शहर उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे हे मंगळवारी दिवसभर महापालिकेत तळ ठोकून होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांच्या सर्व नगरसेवकांशी संपर्क साधून मतदानाचा पसंतिक्रम कसा असेल, याच्या नगरसेवकनिहाय चिठ्ठ्या तयार केल्या आहेत. त्यानुसार नगरसेवक बुधवारी मतदान करतील, असे अपेक्षित आहे. ‘राष्ट्रवादी’ आणि शिवसेना यांचे आठ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील ‘राष्ट्रवादी’च्या एका उमेदवाराला पहिल्या पसंतीचा मतांचा कोटा गाठता येणार नाही. त्यांना शिवसेना आणि भाजपच्या द्वितीय पसंतीच्या मदतीची गरज भासणार आहे. त्यानुसार मतांची जुळवाजुळव करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात त्या पसंतिक्रमाने मतदान घडवून आणण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.

काँग्रेसच्या ‘जादू’कडे सर्वांचे लक्ष

काँग्रेसकडे या निवडणुकीत १० मते असून, त्यांना निवडून येण्यासाठी अतिरिक्त मतांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे इतर पक्षांतील मते फोडून पसंतिक्रमाच्या गणिताची जुळवाजुळव केल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. काँग्रेसने आपला उमेदवार निवडून आणण्यात बाजी मारली, तर त्याचा फटका भाजप की ‘राष्ट्रवादी’ला बसणार, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. सध्या तरी काँग्रेसच्या उमेदवाराचा ‘बंदोबस्त’ करण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितरित्या एकवटल्याचे चित्र महापालिकेत आहे.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here