Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

जगप्रसिद्ध काळू-बाळूचा तमाशा अर्थचक्र बिघडल्याने अडचणीत

Array


सांगली : 40 वर्षांहून अधिक काळ तमाशा क्षेत्रात हुकूमत गाजवणारा , महाराष्ट्र ला वेड लावणारा आणि दिल्लीचे तख्तचीही वाहवा मिळवनारा सांगलीतील कवलापूरचा काळू-बाळूचा तमाशा सध्या अडचणीत आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून फड बंद असल्याने अधिकच अडचण या तमाशा कलाकाराची झाली होती. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झला असल्याने गावा गावातील यात्रा पुन्हा गजबजणार असे दिसतेय. त्यामुळे या यात्रात तमाशाच्या सुपाऱ्या देखील जास्त मिळण्याची आशा आहे. मात्र या तमाशात पुन्हा जीव आणण्याची, तमाशा पुन्हा सुरू करण्याची आर्थिक ताकद देखील या मंडळींकडे सध्या नाही. 

सांगलीतील कवलापूरचा काळू-बाळूचा तमाशा 40 वर्षांहून अधिक काळ तमाशा क्षेत्रात हुकूमत गाजवणारा, महाराष्ट्रला वेड लावणारा आणि दिल्लीचे तख्ताचीही वाहवा मिळवणारा आहे. लहू उर्फ काळू संभाजी खाडे आणि अंकुश उर्फ बाळू संभाजी खडे या जोडीने महाराष्ट्रला अनेक दशके पोट धरून हसवले.  काळू-बाळूच्या रूपाने चौथ्या पिढीने तमाशाचा फड गाजवला. आता पाचवी पिढी देखील यामध्ये उतरली आहे .पण तमाशा चालवताना या मंडळी समोर येणाऱ्या अडचणी, संकटे मोठी आहेत. 

Kantabai Satarkar : ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांची कारकीर्द फोटोच्या माध्यमातून

मागील दोन वर्षात कोरोनामुळे सलग दोन वर्षे गावोगावच्या यात्रा बंद होत्या. त्यामुळे तमाशाना मागणीच नाही. या कोरोना काळात काळू बाळूच्या घरातील काही जणांचे निधन झाले. या पाठोपाठच्या संकटाने हे कुटंब आणि याचा तमाशाचा फड अधिकच अडचणीत आला.आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.  यात्रा गर्दीने फुलतील, तमाशा फडाच्या सुपाऱ्या मिळतील अशी आशा या कलाकारांना आहे. मात्र पुन्हा तमाशा सुरू करण्यासाठी पैशाची गरज आहे. तमाशा फडातील बरच साहित्य खराब देखील झाले आहे. पाठोपाठच्या संकटाने या मागील दोन वर्षात काहीच रक्कम शिल्लक नसल्याने पुन्हा हा फड उभा करण्याची आणि आणि तमाशाचे अस्तित्व टिकवण्याची  लढाई सुरू आहे.  तमाशा सारखी ही कला, वारसा या संकटात लुप्त होऊन द्यायचा नसेल तर या कलेला पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक आधार देणे गरजेचे आहे.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here