Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Crime news : चारा तोडून देण्याचे आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Array


धुळे : चारा तोडण्याचे आमिष दाखवत तब्बल 71 वर्षाच्या नराधमाने अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  याप्रकरणी मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याने वापरलेली सायकल देखील ताब्यात घेण्यात आली आहे.

दीपोत्सवाच्या धामधुमीत 2 नोव्हेंबरला अकरा वर्षीय पीडित मुलगी दुपारी एक ते सायंकाळी सहाच्या दरम्यान बोकडासाठी चारा घेऊन येते असे सांगून  घरातून निघाली.  या वेळी संशयित शांताराम अहिरे याने रेल्वे पट्ट्याजवळ चारा तोडून देण्याचे आमिष दाखविले त्यामुळे अल्पवयीन पीडिता त्याच्यासोबत निघाली. शांताराम अहिरेने तिला सायकलवर बसून सावळदे शिवारातील शेतात नेले तेथे पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार करत याबाबत कुणाला काही सांगितल्यास तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अल्पवयीन पीडिता घाबरून गेली तिने त्या दिवशी घटनेबाबत कुठलीच वाच्यता केली नाही.

सोमवारी अल्पवयीन पीडितेच्या पोटात दुखू लागले याबाबत तिने तिच्या आईला घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. यानंतर घाबरलेल्या तिच्या आईने सासू व अन्य नातेवाईकांशी चर्चा करत सोमवारी रात्री उशिरा या घटनेबाबत मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.  या प्रकरणी संशयित शांताराम शिवराम अहिरे याच्याविरुद्ध पोक्सो कायदासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच या घटनेत त्याने वापरलेली सायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

संबंधित बातम्या :

 Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here