Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Breaking News LIVE Updates : दिवसभरातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…

Array


जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. सरकारनं समिती नेमल्यानंतरही एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम, सलग दुसऱ्या दिवशी राज्यभरात एसटी बंद. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे.

न्यायालयाच्या निर्देशांचं सरकारकडून पालन, कोर्टाचा आदेश बघून पुढचा निर्णय घेणार – परिवहन मंत्री अनिल परब
कोर्टोच्या आदेशाचं कुणीही उल्लंघन करु नये, अन्यथा कारवाई करण्याबाबत निर्णय घेऊ. न्यायालयाच्या निर्देशांचं सरकारकडून पालन, कोर्टाचा आदेश बघून पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 

तामिळनाडूत मुसळधार पाऊस; ‘रेड अलर्ट’ जारी
Heavy Rain in Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये चेन्नईसह अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच आयएमडीनं येणाऱ्या दिवसांत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, केरळ, माहे, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या भागांत 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांच्यासोबत संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, आमदार मिटकरी यांची ट्वीटरवर माहिती. सायबर सेलकडे केली तक्रार

Padma Awards 2020: आनंद महिंद्रा यांच्यासह महाराष्ट्रातील मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव
Padma Awards 2020:  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती भवन येथे सोमवारी सायंकाळी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते. Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here