Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Ashish Shelar on Nawab Malik : मुख्यमंत्र्यांनीच नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल करावी

ArrayAshish Shelar on Nawab Malik : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आशिष शेलार पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे नेते राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले. मलिक यांनी फडणवीस यांनी केलेले आरोप मान्य केले असल्याचा दावा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आता या प्रकरणात स्वत:च एफआयआर दाखल करावा आणि चौकशी करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. 

नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांच्याविरोधात हल्लाबोल केला. राज्यातल्या ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत हे फडणवीस यांनी उघड केले असल्याचे शेलार यांनी म्हटले. फडणवीस यांनी केलेले आरोप मलिक यांनी मान्य केले असल्याचा दावा शेलार यांनी केला. दीडपट कमी किंमतीत जागा मिळवली हे नवाब यांनी मान्य केले असल्याचे शेलार यांनी म्हटले. आम्हाला 25 रु. स्क्वेअर फूट मध्ये जमीन घ्यावी लागली असे नवाब मलिक सांगत आहेत असेही शेलार यांनी म्हटले. संपूर्ण इमारत भाडयाने कमी किंमतीत कशी मिळते, नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का, असा सवालही शेलार यांनी केला.  

अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध झाकण्यासाठी चांडाळचौकटी काम करत असून  मुंबई 1993 बॉम्ब प्रकरणी आरोपीसोबत मलिक यांचे संबंध असल्याचे शेलार यांनी म्हटले. राज्याचे मंत्री आरोपांची कबुली देत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: एफआयर दाखल करून चौकशी करावी अशी मागणी शेलार यांनी केली. Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here