Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

हिंजवडी मेट्रोचे काम सुरू करा

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटरच्या मेट्रोचे काम येत्या सात दिवसांत सुरू करावे; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा खासदार गिरीश बापट यांनी सोमवारी ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ला (पीएमआरडीए) दिला. सात दिवसांत हे काम सुरू झाले नाही, तर प्रसंगी बेमुदत उपोषण करण्याची तंबीही त्यांनी दिली.

शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रोचे काम सुरू करण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. खासदार बापट यांनी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनीता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, अमोल बालवडकर, आदित्य माळवे आणि ज्योती कळमकर आदी उपस्थित होते.

‘हिंजवडी ते शिवाजीनगर या प्रस्तावित मेट्रोमार्गाचे काम गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे निधी खर्च होऊनही हा मेट्रो मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होणे शक्य नाही. ही मेट्रो वेळेत पूर्ण न झाल्यास अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागेल,’ अशी भीतीही बापट यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

‘शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम प्रलंबित आहे. शिवाजीनगर आकाशवाणी ते बाणेरपर्यंतच्या विविध भागांतील जागा महापालिकेच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे जागा संपादनात काही अडचण आल्यास राज्य सरकार तसेच संबंधित कंपनीला आम्ही सहकार्य करू. आगामी सात दिवसांत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्यास आम्ही आंदोलन करणार आहोत,’ असे बापट यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मेट्रोसाठी लागणारी आवश्यक जागा ताब्यात घेण्यात आली असून, चार दिवसांत कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. विद्यापीठ रस्त्यावर ‘इंटिग्रेटेड फ्लायओव्हर’ बांधण्यात येणार असून, पहिल्या उड्डाणपुलावर दुचाकी, चारचाकी वाहनांना जाता येईल. त्यावरील उड्डाणपुलावरून मेट्रो धावणार आहे, असेही डॉ. दिवसे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना वेळ नाही?

हिंजवडी-शिवाजीनगर प्रकल्पाचे काम आधी जुलै-ऑगस्टमध्ये, मग गणपतीनंतर आणि त्यानंतर नवरात्रीत सुरू होण्याच्या घोषणा केल्या गेल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे काम सुरू व्हावे, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र, ठाकरे यांना वेळ नसल्यानेच या कामाला विलंब होत असल्याची चर्चा आहे.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here