Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

शहरात रक्ताचा तुटवडा

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

लसीकरणानंतर रक्तदानाचे प्रमाण घटले असून, दिवाळीमुळे विद्यार्थी, कामगार, नोकरदार गावी गेल्याने शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अवघे दोन दिवसच पुरेल एवढाच रक्ताचा साठा रक्तपेढ्यांमध्ये शिल्लक आहे.

शहरातील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. डेंगीचे वाढलेले रुग्ण, त्यासाठी उपयुक्त प्लेटलेट्स यामुळे रक्ताची मागणी वाढल्याचे निरीक्षण रक्तपेढ्यांनी नोंदविले आहे. ‘केईएम रक्तपेढी’चे विभागप्रमुख डॉ. आनंद चाफेकर म्हणाले, ‘शहरात डेंगीचे रुग्ण वाढल्याने प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. त्यामुळे आमच्याकडे काही दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा शिल्लक आहे. दिवाळीमुळे रक्तदान शिबिरांमध्ये खंड पडला. लसीकरणानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते. आमच्या रक्तदात्यांपैकी अनेकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे रक्ताची अडचण भासत आहे.’

शहरात सध्या एक ते दोन दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा शिल्लक असून, रक्तदानासाठी नागरिक पुढे येत नसल्याची खंत ‘रक्ताचे नाते’ ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांनी व्यक्त केली. ‘लसीकरण; तसेच करोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे नागरिक रक्तदान करीत नाहीत. शहरातील रुग्णालयांमध्ये यकृत, मूत्रपिंड प्रत्यारोपण वाढत असून, त्यासाठी एका रुग्णासाठी २० पिशव्यांची गरज भासते. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पुणेकर शहराच्या बाहेर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर दात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे,’ असे आवाहनही बांगड यांनी केले.

शहरात एक ते दोन दिवसांचाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे. सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई आहे. रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांचे नातेवाइक वाद घालतात. रक्तदान झाल्याशिवाय रक्त उपलब्ध होऊच शकत नाही. त्यामुळे पुणेकर रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे.

– डॉ. पौर्णिमा राव, सचिव, इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँड इम्युनॅटॉलॉजी

‘वर्क फ्रॉम’चाही फटका?

‘दोन वर्षांपासून शहरात करोनाच्या संसर्गामुळे अनेक आयटी कंपन्यांचे कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये होणारी रक्तदान शिबिरे बंद झाली आहेत. रक्तदान शिबिरे बंद झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे,’ असे निरीक्षण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाचे प्रमुख डॉ. संजीव केतकर यांनी नोंदविले. रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी पुणेकर तरुणांनी पुढे यावे, असेही आवाहनही त्यांनी केले.

रक्तपेढ्यांची देवाण-घेवाण बंद

शहरातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांकडून रक्तातील विविध घटकांची देवाण-घेवाण होत होती. त्यामुळे गरजूंना वेळोवेळी रक्त मिळत होते. मात्र, रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने ही देवाणघेवाणही थांबली आहे. एका रक्तपेढीने दुसऱ्या रक्तपेढीकडे मागणी नोंदवल्यास ‘बदल्यात दाता द्या,’ अशी मागणी होत आहे. रक्तातील ‘प्लाझ्मा’चा अधिक साठा असून, ‘प्लेटलेट’ आणि लाल पेशींचा तुटवडा भासत असल्याचे निरीक्षण रक्तपेढ्यांनी नोंदविले.

४२

जिल्ह्यातील एकूण रक्तपेढ्या

२५

शहरातील रक्तपेढ्या

एक हजार युनिट

शहरातील दैनंदिन रक्ताची गरज

२०० ते ३०० युनिट

सध्या उपलब्ध होणारे रक्तSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here