Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

पुण्यात थरार! प्लायवुडच्या गोदामाला लागलेली आग आटोक्यात येत असतानाच महावितरणच्या डीपीनं पेट घेतला आणि…

Array


हायलाइट्स:

  • पुण्यात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग
  • उंड्री पिसोळी येथे सकाळी साडे सहा वाजता घडली दुर्घटना
  • जीवितहानी नाही, मात्र मोठे आर्थिक नुकसान

म. टा. प्रतिनिधी । हडपसर

लाकडी फर्निचर बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लायवुडच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज उंड्री पिसोळी, दगडे वस्ती येथे घडली. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून पहाटे साडे सहा वाजता वाजेपर्यंत आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळला. (Major fire at Pune Furniture Godown)

वाचा: एसटी संपाविरोधात राज्य सरकार आक्रमक; ‘हा’ निर्णय घेतला जाण्याची शक्यता

गोडाउन तब्बल २४ हजार स्क्वेअर फूटचे आहे. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लायवुडच्या थप्प्या लावण्यात आल्या होत्या. चहूबाजूला लाकडी प्लायऊड असल्याने आगीने उग्र रूप धारण केले होते. आग लागलेल्या गोदामाच्या बाजूला आजूबाजूला इतर गोदामे असल्याने आग नियंत्रणात आणताना अग्निशामक दलाच्या जवानांची चांगलीच दमछाक झाली. शेजारी महावितरणचा हाय होल्टेजचा डीपी आहे. आगीच्या झळा त्या डीपीपर्यंत पोहोचल्या आणि काही क्षणातच डीपीनंही पेट घेतला. गोडाऊनची आग आटोक्यात आणत असताना डीपीला आग लागल्याचे समजताच पथकातील काही जवान तात्काळ डीपीची आग आटोक्यात आणण्यासाठी धावले. काही वेळेतच तिथली आग नियंत्रणात आली.

वाचा: मुंबईत मोठी दुर्घटना! एक मजली घर कोसळून ९ जखमी

आगीची तीव्रता लक्षात घेऊन कात्रज, हडपसर, मुख्य अग्निशामक केंद्र व पीएमआरडीच्या असे एकूण १४ गाड्या आणि टँकर घटनास्थळी दाखल झाल्या होते. इतर गोडाऊनला आग लागू नये म्हणून अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून सकाळी साडेसहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली, यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, प्लायवूडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग नियंत्रणात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे. आग कशामुळे लागली याचं कारण समजू शकलं नाही. घटनास्थळी कोंढवा पोलीस व गोडाऊनचे व्यवस्थापक अरिफ शेख उपस्थित होते.

वाचा: फडणवीस आज कोणता बॉम्ब फोडणार? नीरज गुंडेंच्या ट्वीटमुळं उत्सुकता वाढली!Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here