Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

किरण गोसावीच्या पोलिस कोठडीत वाढ

Array


पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला ‘क्रूझ ड्रग्ज’ प्रकरणातील पंच किरण गोसावी आपल्या फेसबुक व ई-मेलचा पासवर्ड आठवत नसल्याचे सांगत असून, त्याबाबत माहिती देत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या गुन्ह्यात फरार असताना त्याने सचिन पाटील या नावाने बनावट आधार कार्ड बनवून घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने, किरण प्रकाश गोसावी (वय ३७, रा. वाशी, नवी मुंबई) याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी हा आदेश दिला.



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here