Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

आता प्रवाशांची लुबाडणूक

Array


टीम मटा, पुणे

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे एसटीची बससेवा ठप्प झाल्याने खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांची लुबाडणूक केली. नगर ते पुणे प्रवासासाठी पाचशे रुपये मोजावे लागले. नाशिकहून पुण्यासाठी ८०० ते १००० रुपये ‘वसूल’ केले गेले. दिवाळीच्या सुट्या संपवून परतीचा प्रवास करणाऱ्यांना नाइलाजाने ही लूटमार सहन करावी लागली.

नगर-पुणे पाचशे रुपये!

नगर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका प्रवाशांना बसू लागला आहे. एसटी बंद असल्याने प्रवाशी खासगी वाहतुकीकडे वळल्याने त्यांनी अघोषित भाडेवाढ केली आहे. रविवारी रात्री नगरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना पाचशे रुपये भाडे मोजावे लागल्याच्या तक्रारी आहेत. इतर ठिकाणी जाण्यासाठीही जादा भाडे द्यावे लागत आहे. रविवारी दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत नगरहून पुणे, मुंबई आणि औरंगाबादला परतणाऱ्यांची संख्या मोठी होती. या संधीचा गैरफायदा उठवत खासगी वाहतूकदारांनी पुणे किंवा औरंगाबादसाठी अनेक प्रवाशांकडून पाचशे रुपये भाडे उकळण्याच्या तक्रारी आहेत.

नाशिकला दुप्पट दर

नाशिक :
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय प्रवाशांना स्वीकारावा लागला. याचा गैरफायदा घेऊन ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी दुपटीपेक्षा अधिक भाडे केली. सोमवारी सकाळी पुण्यासाठी ८०० रुपये, तर सायंकाळी एक हजार रुपये आकारण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरवाढ अशी…

शहर – पूर्वी – सध्या

पुणे – ४०० – ८००-१००० ~

मुंबई – ५०० – ९०० ~

कोल्हापूर – ६०० – १२००

सोलापूर – ६५० – १४००

औरंगाबाद – ४०० – ८००

धुळे – ४०० – ५५०

फोटो.

नगरमध्ये बसस्थानकाच्या बाहेर थांबून खासगी वाहने प्रवाशी भरत आहेत. मात्र, जास्त भाडे देण्यास तयार असलेल्या प्रवाशांनाच घेण्यात येत होते.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here