Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

8 नोव्हेंबर अन् रोहित आणि स्मिता पाटीलकडून वडिलांसोबतच्या शेवटच्या भेटीची आठवण

Array
सांगली : महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांचे निधन होऊन काही वर्षे लोटली आहेत. मात्र आर. आर. याचे पुत्र आणि मुलगी यांना आजही आपल्या वडिलांबद्दलच्या अनेक गोष्टी-किस्से आजही स्मरणात आहेत. मागे स्मिता पाटील यांनी आर आर पाटील याचे शेवटचे हस्ताक्षर असलेले एक चिठ्ठी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. तसंच 8 नोव्हेंबर या दिवशीच्या आपल्या वडिलांसोबतच्या आठवणी आज रोहित आणि स्मिता पाटील यांनी शेअर केले आहेत.

पप्पांचा शेवटचा दिवस!

आज 8 नोव्हेंबर … बरोबर 7 वर्ष झाली . माझ्या वडिलाना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन .. ! आजच्या दिवशी 2014 मध्ये सकाळी 11 वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले. काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय असं पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते.  3 नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते. या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते.

6 नोव्हेंबर ला पप्पा अंजनीला घरी आले हेलिकॉप्टर मधून सगळं गाव दोन – दोनदा फिरून बघितले. घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत त्याच प्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांकडे बघून जात असत. पण त्या दिवशी मात्र पप्पा जाताना लोकांच्या मधन वेळ काढून मी व माझी बहिण सुप्रिया आम्ही वरती आमच्या रूममध्ये होतो. तर पप्पा त्या दिवशी वरती येऊन आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली व त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी उभारले होते.  आम्ही दोघी बहिणी ही विचार करू लागलो की पप्पांना काय वाटले असावे की पप्पांनी मिठ्ठी मारली व  पपांच्या डोळ्यात का पाणी उभारले असावे ? पण आम्हाला वाटले नव्हते की,आज पप्पांनी आम्हाला शेवटचे कुशीत घेतले असावे व त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारूती – शंकराचेही न चुकता दर्शन घेतलं होते.

स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की,स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवट चा सत्कार ठरावा ! आता आणखी किती सत्कार करणार? मृत्यू पप्पांना अगोदरच दिसला होता का?
Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here