Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

मेट्रो मार्गासाठी भूसंपादन पूर्ण

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) उभारण्यात येणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या जमिनी ‘पीएमआरडीए’कडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेली भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष कामासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

हा मेट्रो मार्ग २३.३ किलोमीटर लांबीचा असून, त्यावर २३ स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनींपैकी काही जमिनी पहिल्या टप्प्यात हस्तांतरित करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारच्या जमिनी ताब्यात देण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होणे बाकी होते. ती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने या जमिनी ‘पीएमआरडीए’कडे हस्तांतरित झाल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्य सरकारने हा ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ म्हणून घोषित केला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र आणि सरकारच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी विलंब होत असल्यास त्याबाबत प्रक्रिया करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादनाची प्रकिया पूर्ण करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या जमिनींपैकी शिवाजीनगर (भांबुर्डा) येथील आकाशवाणी आणि हवामान विभागाची ६६४.८३ चौरस मीटर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) ३७६.०५ चौरस मीटर, केंद्रीय बीज संशोधन प्रशिक्षण संस्थेची २९०.८९ चौरस मीटर अशा सुमारे १५४०.४१ चौरस मीटर जमिनीचा समावेश आहे. या जमिनी आता ‘पीएमआरडीए’च्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे.’

दरम्यान, राज्य सरकार आणि अन्य खासगी संस्थांच्या ताब्यात असलेल्या जमिनींपैकी औंधमधील टायग्रीस कॅम्प, पुणे ग्रामीण पोलिस, राजभवन, शासकीय तंत्रनिकेतन विभाग, पोलिस भरती मैदान, शिवाजीनगर भागातील शासकीय तंत्रशिक्षण विभाग, पोलिस कवायत मैदान, पोलिस मनोरंजन केंद्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) वसतिगृह, न्यायालय, कृषी महाविद्यालय अशी सुमारे १५ हजार ७९१ चौरस मीटर जमीन यापूर्वीच हस्तांतरित झाली आहे. या जमिनींची मागणी ‘पीएमआरडीए’कडून करण्यात आली होती. त्यापैकी काही जागा या मेट्रो स्थानकांसाठी; तर काही खासगी कंपन्यांना देऊन निधी उभारण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गावर केंद्र आणि राज्य सरकारच्या जमिनी आहेत. त्यातील आवश्यक असलेल्या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या मार्गाचे काम लवकरच सुरू करता येणार आहे.

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारीSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here