Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

महापालिका रुग्णालयातील औषधांवर सहापट खर्च

Array


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

करोनामुळे औषधांच्या खर्चात सुमारे सहापट वाढ झाली आहे. महापालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालयांसाठी आवश्यक असणारी ब्रँडेड औषधे, जेनेरिक औषधे आणि सर्जिकल साहित्यासाठी दोन वर्षांचा खर्च एक कोटी रुपये येतो. मात्र, करोनामुळे औषधांची संख्या वाढल्याने हा खर्च आता सहा कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह सर्व दवाखाने, रुग्णालयांसाठी आवश्यक असणारी औषधे, साहित्य पुरवठा मध्यवर्ती औषध भांडार विभागामार्फत करण्यात येतो. अपवादात्मक परिस्थितीत रुग्णांसाठी आवश्यक औषधे किंवा साहित्याचा पुरवठा मध्यवर्ती औषध भांडाराकडून होत नाही. त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील औषध भांडारात शिल्लक नसणारी; तसेच मध्यवर्ती औषध भांडाराकडील निविदेत समाविष्ट नसणारी औषधांची खरेदी वायसीएम रुग्णालयामार्फत निश्चित केलेल्या स्थानिक एजन्सीकडून निविदाप्रक्रिया राबवून खरेदी केली जातात. ब्रँडेड औषधांच्या किमतीवर १५.५० टक्के सवलत, जेनेरिक औषधांच्या किमतीवर ५६.७० टक्के सवलत आणि सर्जिकल साहित्याच्या किमतीवर ५४ टक्के सवलत या दराने ओमनी हेल्थकेअर सिटीकेअर फार्मसी, कोठारी मेडिकल आणि रुबी अलकेअर सर्व्हिसेस या तीन एजन्सी निश्चित करण्यात आल्या आहेत. औषधांची उपलब्धता आणि वेळेवर रुग्णोपचारासाठी एका पुरवठाधारकावरच अवलंबून न राहता एकापेक्षा जास्त पुरवठाधारक असावेत, या हेतूने या तिन्ही पुरवठादारांकडून औषधे, साहित्य खरेदी करण्यात येते. या निविदेचा कालावधी एक एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ असा दोन वर्षांचा आहे. त्यासाठी सुरुवातीला एक कोटी रुपये खर्चास स्थायी समिती सभेने मान्यता दिली आहे.

करोनामुळे वायसीएम रुग्णालयासह इतर रुग्णालयांतर्गत विलीनीकरण कक्ष सुरू करण्यात आले. एक सप्टेंबर २०२०पासून ऑटोक्लस्टर आणि अण्णासाहेब क्रीडा संकुल येथे जम्बो रुग्णालय सुरू करण्यात आले. या विभागांना आवश्यक साहित्य पुरवठा मध्यवर्ती औषध भांडार विभागाकडून करण्यात येत होता. मात्र, या निविदाप्रक्रियेत करोनासाठी आवश्यक औषधे, साहित्याची खरेदी समाविष्ट नव्हती. मात्र, रुग्णसेवेत अडथळा ठरू नये, यासाठी करोनारुग्णांवर उपचारासाठी एप्रिल २०२०पासून तातडीक औषधे, साहित्य खरेदी नेमणूक केलेल्या या तीन पुरवठाधारकांकडून उपलब्ध करून घेतली जात आहे. या निविदेसाठी मंजूर असलेल्या एक कोटी रुपयांमधून पुरवठा केलेल्या औषधांच्या बिलांची पूर्तता करणे शक्य होत नसल्याने तीन कोटी ५० लाख रुपये वाढीव खर्चास स्थायी समिती सभेने १३ जानेवारी २०२१ रोजी मान्यता दिली. करोनारुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने जानेवारी २०२१मध्ये बंद केलेले अण्णासाहेब क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालय; तसेच इतर बंद केलेली करोना केअर सेंटर आवश्यकतेनुसार सुरू करण्यात आली. त्यामुळे पाच कोटी २० लाख रुपये इतक्या वाढीव खर्चास स्थायीने चार एप्रिल २०२१ रोजी मान्यता दिली. ठेकेदारांनी पुरवठा केलेल्या बिलांपोटी तीन कोटी ५० लाख रुपये रकमेची पूर्तता होणे अद्याप बाकी आहे. निविदेची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे या प्रलंबित बिलांसह पुढील सहा महिने कालावधीसाठी वाढीव दोन कोटी ५० लाख रुपये याप्रमाणे अंदाजे सहा कोटी रुपये इतका वाढीव खर्च होणार आहे.

‘तीन एजन्सीमुळे खर्चात वाढ’

करोनाकाळात औषधांचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासू नये, वेळेवर औषधे उपलब्ध व्हावी, यासाठी एकाच एजन्सीवर अवलंबून न राहता तीन एजन्सी नेमल्या. त्यांच्याकडून गरजेनुसार औषध खरेदी केली गेली आहे, करोनामुळे औषधांच्या संख्येत आणि परिणामी खर्चात वाढ झाली आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here