Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Homeपावसाच्या फटक्याने बासमतीच्या भावात २५ टक्के वाढ
Array

पावसाच्या फटक्याने बासमतीच्या भावात २५ टक्के वाढ


म. टा. प्रतिनिधी, पुणे

हरियाणा, पंजाबमध्ये झालेला परतीच्या पावसामुळे बासमती तांदळाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच बासमती तांदळाच्या भावात २० ते २५ टक्के भाववाढ झाली आहे. गेल्या वर्षी ११२१ बासमती तांदळाचा एका किलोसाठी ७० ते ७५ रुपयांदरम्यान असलेला भाव सध्या ८५ ते ९० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

‘बासमती तांदळामध्ये पारंपरिक, ११२१, १५०९, १४०१ असे तांदळाचे चार प्रकार विकले जातात. त्यात सर्वप्रथम १५०९ बासमती हा गेल्या महिन्यापासून बाजारात आला आहे. ११२१ या जातीचे पीक येण्यास सुरुवात झाली आहे. पारंपरिक बासमती बाजारात येण्यास अजून १५ दिवस ते महिन्याचा कालावधी आहे. ११२१, १५०९, १४०१ हे बासमती तांदूळ लग्न समारंभ, हॉटेल आणि बिर्याणीसाठी वापरतात. काही वर्षांपासून बिर्याणीसाठी बासमती तांदळाचा खप देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या प्रकारच्या तांदळाची मागणीही वाढली आहे. यंदा बासमती तुकड्याचीही निर्यात झाल्यामुळे त्याचा तुडवडा भासत आहे. त्यामुळे बासमती तुकड्यामध्ये ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल भाववाढ झाली आहे,’ अशी माहिती तांदळाचे व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी दिली.

नवीन हंगाम सुरू होताना बासमती तांदळाच्या दरात मोठ्या प्रमाणात तेजी झाली आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका बसत आहे. यंदा आठ ते १० टक्के पेरण्या कमी झाल्या आहेत. निर्यातीत वाढलेली मागणी, देशांतर्गत बाजारात बासमतीचा वाढलेला खप यामुळेसुद्धा तेजी झाली आहे. काही महिन्यांपासून निर्यातीसाठी लागणाऱ्या कंटेनरच्या भाडेदरात मोठी भाववाढ झाली होती. त्यातच डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रकचे भाडे हे १०० ते १५० रुपये प्रतिक्विंटलने वाढले आहे. याचा एकत्रित परिणाम बासमतीच्या भावावर झाला असून यंदा त्यात २० ते २५ टक्के भाववाढ झाली आहे. तसेच यंदा पारंपरिक सुवासिक बासमतीचे जुन्यापेक्षा नवीन तांदळाचा भाव जास्त राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कंटेनरच्या भाडेदरात वाढ कमी झाल्याने पुन्हा निर्यातीमध्ये वाढ होत असून, अनेक देशांमध्ये माल जाऊ लागला आहे. भारतीय बासमती तांदूळ खरेदी करणाऱ्या देशामध्ये प्रामुख्याने इराण, इराक, सौदी अरेबिया, युरोप आणि अमेरिकेचा समावेश होतो. इराणमध्ये साधारण १४ लाख टन, युरोप आणि सौदी अरेबियाला प्रत्येकी चार ते पाच लाख टन आणि अमेरिकेला दोन ते तीन लाख टन माल निर्यात होतो. एकूण बासमती तांदळाच्या निर्यातीचे प्रमाण ४० ते ४५ लाख टन आहे. साधारण १५ त १७ लाख टन माल हा देशांतर्गत विकला जातो. बासमती तुकड्याचा देशात २० ते २५ लाख टन खप आहे. दरवर्षी देशात एकूण बासमतीचे उत्पादन ७० ते ७५ लाख टन होते.

बासमतीचा प्रतिक्विंटल भाव

प्रकार रुपये

११२१ ८,५०० ते ९,०००

१५०९ ७,५०० ते ८,०००

१४०१ ७,२०० ते ७,७००Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments