Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

नवाब मलिकांना ज्ञानदेव वानखेडेंच्या याचिकेवर उत्तर देण्याचे हायकोर्टाकडून निर्देश

Array


मुंबई : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर केलेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मानहानीची याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं नबाव मलिक यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नवाब मलिक सोशल मीडियावर धडाधड उत्तर देत आहेत, तर अपेक्षा आहे की इथंही ते पटापट उत्तर देतील असा टोला लगावत नवाब मलिकांना मंगळवारपर्यंत यावर उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचं विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. वानखेडे हे भ्रष्ट असल्याचं सिद्ध करण्यासाठी मलिक यांनी त्यांचा जन्म दाखला, पहिल्या विवाहाचे फोटो व वडिलांचं दुसरं नाव असे तपशीलही जाहीर केलेत. समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. तसेच वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे. त्यामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे. मलिक यांचे हे आरोप वानखेडे कुटुंबियांनी फेटाळल्यानंतरही मलिक यांनी नवनवे आरोप आणि खुलासे करणं सुरूच ठेवलंय. नुकताच त्यांनी समीर वानखेडेंच्या मेव्हणीवर म्हणजेच क्रांती रेडकरच्या बहिणीवरही ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याबद्दल सावल उठवलेत. त्यामुळे संतापलेल्या ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. मलिक हे रोज नवनवे आरोप करत असून ते सर्व आरोप हे चुकीचे, निराधार आहेत. मात्र, या सगळ्यांमुळे आमची नाहक बदनामी होत असून कुटुंबियांची प्रतिमा मलिन होत आहे.

Sameer Wankhede Case : नवाब मलिकांच्या विरोधात समीर वानखेडेंचे वडील कोर्टात, 1.25 कोटींचा मानहानीचा दावा

सध्या सोशल मीडियातून वानखेडे धमक्या मिळत आहेत. तसेच अनेक आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत, याचा आम्हाला प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचं ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात दाखल अर्जात म्हटलेलं आहे. त्यावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुट्टीकालीन कोर्टात न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. मलिक हे दररोज सकाळी समीर नावखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांबाबत सोशल मीडियावर पोस्ट करतात. सोमवारी सकाळीही त्यांनी समीर वानखेडे यांच्या मेहुण्यांबद्दल कथित ट्विट केले असून हे सर्व आरोप निराधार असून वानखेडे यांच्यासह कुटुंबियांबाबत सुरू असलेली बदनामी थांबविण्यात यावी, अशी मागणी कोर्टाकडे केली गेली. मात्र आम्हाला यासंदर्भात कोणतीही नोटीस मिळालेली नाही. तसेच ज्ञानदेव यांनी स्वत:साठी हा खटला दाखल केलाय की, मुलगा आणि मुलीच्यावतीनंही हा खटला दाखल केलाय? असा सवाल मलिक यांच्यावतीनं अॅड. अतुल दामले यांनी उपस्थित करत या याचिकेवर आक्षेप नोंदवला. मात्र, हा खटला कुटुंबातील सदस्यांविरोधात होणाऱ्या बदमानीकारक विधानांबाबत आहे असं वानखेडेंच्यावतीनं स्पष्ट केलं.

 नवाब मलिक यांना माझगाव न्यायालयाकडून नोटीस 

आपल्या कुटुंबियांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप नेते मोहित भारतीय यांनीही नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबईतील माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली. एका पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी जाणूनबुजून भारतीय आणि त्यांचा मेहुणा ऋषभ सचदेवा यांची बदनामी केल्याचा दावा या याचिकेतून भारतीय यांनी केला आहे. मलिक यांना 9 ऑक्टोबर रोजी कायदेशीर नोटीस बजावून आक्षेपार्ह विधान करणं बंद करण्यास सांगितलेलं होतं. 11 ऑक्टोबर रोजी याबाबत त्यांना दुसरी नोटीसही बजावण्यात आली. मात्र, तरीही मलिक यांनी आरोप करणं सुरूच ठेवलंय. त्याविरोधात भारतीय यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 499 आणि 500 (मानहानी) अंतर्गत दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. त्याची दखल घेत दंडाधिकारी पी. आय मोकाशी यांनी मलिक यांना सोमवारी नोटीस बजावली आहे.

 

 Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here