Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

देवेंद्र फडणवीसांमुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ अन् नागरिकांना पुराचा फटका बसला: मेधा पाटकर

Array


Kolhapur Latest Updates : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ (Kolhapur Flood Update) झाला असून नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागत आहे, अशी टीका पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी टीका केली आहे. त्या कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होत्या. 

मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे की, पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळाला नाही. त्यामुळे त्यांनी क्रिडाईनं पूर रेषेच्या बाबतीत दिलेला अहवाल स्वीकारला. शिवाय निळा आणि लाल रेषेतील बांधकामांना सरसकट सूट दिली. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर जाऊन पर्यावरणासंदर्भात मोठमोठी वक्तव्य करत आहेत..मात्र त्याच वेळी देशात काय परिस्थिती सुरू आहेत याकडे मात्र दुर्लक्ष आहे, अशी देखील टीका मेधा पाटकर यांनी केली आहे. 

मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे की,  गेल्या दोन-तीन वर्षांपासून महापूराची तीव्रता वाढली आहे…या सर्वाला पूररेषेच्या बाबतीत बेजबाबदारपणे निर्णय घेणाऱ्या घेणारे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यामुळे किमान आतातरी पूर रेषेची नव्याने आखणी करणे गरजेचे आहे. अशी मागणी मेधा पाटकर यांनी केली आहे. नद्यांमधील गाळ आणि वाळू काढून खोलीकरण करणे हे पूर्णता अशास्त्रीय आहे. यातून केवळ ठेकेदारांचे भले होणार आहे.. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी अपेक्षा देखील यावेळी मेधा पाटकर यांनी व्यक्त केली. 

रायगड, चिपळून, कोल्हापूर आणि सांगली आलेल्या महापुराने भविष्यातील धोक्याचा इशारा दिला आहे.  केवळ सरकारच सर्व प्रश्न सोडवेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. आता यामधील अभ्यासकांनी अधिक लक्ष घालून पर्यावरणाची संरचना लक्षात घेऊन नियंत्रणासाठीचे शाश्वत उपाय अंगीकरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असं मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.   



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here